अखेर साकोलीत नागझिरा रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू

212

🛑 अखेर साकोली नागझिरा रोडवरील अवैध अतिक्रमण पाडण्यास सुरुवात •

🛑 नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी बजावली होती नोटीस ; पोलीस बंदोबस्तात “अतिक्रमण हटाव” सुरू •

🔘 साकोली / महाराष्ट्र
FRI. 11. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 साकोली : शहरातील नागझिरा वन्यजीव अभयारण्य रोडवरील वाढते व पक्के अतिक्रमणांचा सपाटा काही दिवसांपासून सुरू होता. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन येथे शाळकरी विद्यार्थ्यांसोबत अपघाताचा धोका अटळ होता. यांची गांभिर्याने दखल घेऊन येथील नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी ८ दिवसाअगोगर नोटिस बजावली होती. आणि शुक्रवार ( ११ ऑगस्ट ) ला सर्व अवैध अतिक्रमण काढण्यासाठी सुरूवात केली आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेश पत्रानुसार नागझिरा अभयारण्य रोडवरील अतिक्रमणदारांना हटविण्यासाठी नगरपरिषद साकोली येथे तसे पत्र आले होते. कारण या नागझिरा अभयारण्य रोडवर असंख्य शाळा, महाविद्यालये असून दररोज शाळकरी मुलांचे आवागमन असते. या रोडवर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणधारकांनी अगदी रोडवरच काही फूट अंतरावर पक्के बांधकाम करून शासकीय जागेवर अतिक्रमणांचा सपाटा चालविला होता. याबाबद शहरातील असंख्य जनतेने या संतापजनक प्रकारावर विरोध दर्शविला. नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी सदर शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी दि. ०२/०८/२०२३ पासून सात दिवसांचे आत हे अतिक्रमण काढण्यासाठी सर्वांना नोटीस बजावले होते. अखेर ११ ऑगस्टला दू. १२ पासून नगरपरिषद प्रशासनाने जेसीबी लावून नागझिरा रोडवरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी सुरूवात केली आहे. घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी जमली होती. यातच येथे कोणतीही अनुचित घटना घडू नये व वातावरण चिघळू नये व शासनाच्या आदेशानुसार नियमाने कार्य पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांनी नागझिरा रोडवर चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी स्वप्निल हमाने, नगर अभियंता संतोष दोंतुलवार, धीरज राणे, प्रकाश गेडाम, आनंद रंगारी यांसह साकोली पोलीस ठाणे येथील चमू हजर होती. तब्बल २५ वर्षांनंतर साकोलीत शासकीय जागेवरील हे अतिक्रमण काढण्यासाठी येथील नव्यानेच आलेले कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या या कार्याची प्रत्येक जनतेत व शाळा महाविद्यालयांकडून प्रशंसा केली जाते आहे.
[ Warning ⚠️ Do not 🚫 Copy this Global Maharashtra News ]