अतिक्रमण हटविण्यासाठी उकारा गावकरी धडकले वनविभागावर

70

🛑 अतिक्रमण हटविण्यासाठी उकारा ग्रामस्थ धडकले वनविभागावर

🛑 निवेदनात १७ ऑगस्टपासून दिला आमरण उपोषणाचा इशारा • शासकीय वनजमिन नावे करणा-यांना तात्काळ निलंबित करा • तलाठ्यांना झाली होती अटक •

📡 साकोली / महाराष्ट्र
Mon. 07. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

⛔ साकोली : जवळील उकारा येथील शासकीय वनजमिनीवर अरेरावी करून अतिक्रमण करीत खोटी व बनावट कागदपत्रे तयार करीत शासनाची दिशाभूल आणि सदर जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह महिला पुरुष गावकरी सोमवार ( ०७ ऑगस्ट ) साकोली वनविभाग कार्यालयावर धडकले. यात मागणींचे निवेदन सादर करीत ही कारवाई तात्काळ न झाल्यास १७ ऑगस्ट पासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला. यावेळी साकोली पोलीसांचा येथे चोख बंदोबस्त ठेवला होता.
⛔ मौजा उकारा त.सा. क्र. ०७, येथील गट क्र. २६३/१ आराजी ०.६५ हे.आर या शासकीय वनजमिनीतील अतिक्रमण प्रस्ताव उपविभागीय अधिकारी साकोली यांनी रद्द केले. असे असतांनाही शिवचरण रामजी सोनवाने यांनी त्या वनजमिन जागेवरील अतिक्रमणाचा ताबा सोडला नसून गावकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करीत जबरदस्ती शेती करीत आहेत. याबाबद तलाठी, तहसिलदार, वन विभाग अधिकारी यांना माहिती व पत्र निवेदने देऊनही कारवाई का करण्यात येत नाही.? जागा शासकीय वनविभागाची असून शिवचरण सोनवाने यांनी संपूर्ण कागदपत्रे बनावट खोटे शिक्के व सह्या मारून तलाठी संगनमताने शासनाला खोटी नोंद का घेतली.? जमिनीवर वनविभागाचा शासकीय फलक लागला असतांनाही तेथे रोवणी कशी काय होते.? तत्कालीन वन क्षेत्र सहायक आर.बी. धोटे यांचे शासकीय बनावटी शिक्के करून तलाठी कार्यालय विर्शी येथून खोटे अतिक्रमणे नोंद कुणी केली.? नमुना – १ ( ई ) यात खोडतोड करीत खोटे कागदपत्रे कुणी तयार केली.? त्यावेळी समंधित तलाठीवर गुन्हा दाखल होत अटकही झाली होती, यात काही वन विभाग कर्मचारी, तलाठी यांच्या संगनमताने शासनाची दिशाभूल व फसवणूक करून गंभीर गुन्ह्यांसाठी कोण शह देत आहे.? असा संतप्त सवाल सरपंचा शालू इळपाते, उपसरपंच युवराज खोटेले, गणेश खोटेले व सदस्यांनी वनक्षेत्र अधिकारी यांच्या दालनात उपस्थित केला. यावेळी शंभरावर उकारा येथील महिला पुरुष ग्रामस्थ वनविभागावर धडकले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी साकोली, तहसिलदार साकोली यांना निवेदन सादर केले. या निवेदनात मागण्या १) आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केली त्यावर कारवाई करावी. २) उकारा गट क्र. २६३/१ आराजी ०.६५ या वनजमिनीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे. ३) तलाठी साखरवाडे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. ४) या षडयंत्रात सामिल वनविभागातील समंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. ५) गट क्र. २६३/१ आराजी ०.६५ ही वनजमिन शासनाने तात्काळ आपल्या ताब्यात घेऊन तेथे सामाजिक वनसंवर्धन निर्माण करावे. ६) शासनाची दिशाभूल करणारे दोषी शिवचरण सोनवाने यांवर उच्चस्तरीय कारवाई करण्यात यावी. असे सरपंचा शालू इळपाते, उपसरपंच युवराज खोटेले, तंटामुक्त समिती अध्यक्ष अर्जून इळपाते, वनसमिती अध्यक्ष नंदलाल भलावी, ग्रामपंचायत सदस्य भिमराज रामटेके, विजय इळपाते, गणेश खोटेले, अशोक पालीवाल व शंभराहून अधिक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह मागण्यांचे निवेदन वनक्षेत्र अधिकारी मनिषा चव्हाण यांना देण्यात आले. सदर निवेदनावर तातडीने कारवाई न झाल्यास १७ ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी साकोली यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला. उकारा येथील शंभराहून महिला पुरुष नागरीक साकोली वनविभाग कार्यालयावर धडकल्याची माहिती कळताच साकोली पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांनी तेथे कोणतीही अनुचित घटना घडू नये व शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने वन विभाग परीसरात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
[ Do not 🚫 Copy this Global Maharashtra News Media ]