नगरपरिषद बगिचा बांधकाम अखेर दक्ष जनतेने हाणून पाडले

105

🛑 नगरपरिषद बगिचा निर्माण बांधकाम दक्ष जनतेनी हाणून पाडले •

🛑 घटनास्थळी शेकडो नागरिकांनी केला “त्या जागेवर प्रतिबंध ; अन्यथा दिला आंदोलनाचा इशारा ; जनतेला विश्वासात न घेता न.प. मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप

साकोली / महाराष्ट्र
FRI. 04. 08. 2023
रिपोर्ट •आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 साकोली : शहरातील सेंदूरवाफा येथे १०० वर्षांपासून परंपरागत गायगोधन जागेवर नगरपरिषदेने कोणालाही विश्वासात न घेता येथे बगिचा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाचे राधेश्याम मुंगमोडे व वंचित बहुजन आघाडीने हाणून पाडला. येथे शेकडोंच्या वर जनतेने या जागेवर बगिचा निर्माण करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यामध्ये नगरपरिषद मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार साध्य करण्यासाठी हा संतापजनक प्रकाराला थारा देत असल्याचा आरोप भाजयुमोचे राधेश्याम मुंगमोडे यांनी करीत हे बांधकाम अखेर बंद पाडले.
🔳 सेंदूरवाफा येथे जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथ. शाळेसमोरील रिकाम्या जागेत १०० वर्षाअगोदर पासून सार्वजनिक दिवाळीनंतर जनता गाईगोधन पुजा करतात. या खुल्या जागेवर काही दिवसांपासून नगरपरिषद कुणालाही विश्वासात न घेता यावर बगिचा निर्माण सुरू केले. पारंपारिक सणाच्या नियोजित जागेवर काहीही करू नये करीता येथे नागरीकांचा जमाव येत याला तीव्र विरोध करण्यात आला. यावेळेस महिलाही संतप्त होऊन कुणालाही विश्वासात न घेता या जागेवर बगिचा निर्माण बांधकाम थांबले नाही तर जनतेचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथे देण्यात आला आहे. नगरपरिषदेत दोन वर्षांपासून प्रशासक आहे. याचा गैरफायदा घेत निव्वळ पैशाची धुळधाण लावल्यासाठी काहींनी मोठा भ्रष्टाचार साधण्यासाठी हे षडयंत्र रचिले जात आहे असाही येथे संतप्त सवाल उचलून सदर बगिचा बांधकाम अखेर जनतेने बंद पाडले. यावेळी भाजयुमोचे राधेश्याम मुंगमोडे यांनी सांगितले की शहरातील नागझिरा रोडवर बाहेरील आलेल्या लोकांचे अतोनात अतिक्रमणे थाटून शासकीय भूखंडावरील जागा बळकावली जात आहे व त्याकडे नगरपरिषद लक्ष न देता असा भ्रष्टाचार कुठे करता येईल या कामात लागलेली आहे असा थेट आरोप करण्यात आला. या जागेवर सदर अवैधरित्या बगिचा निर्माण बांधकाम बंद पाडण्यासाठी भाजयुमोचे राधेश्याम मुंगमोडे, वंचित बहुजन आघाडीच्या तनुजा नागदेवे, गोवारी समाजाचे ओमकार चौधरी, सामाजिक कार्यकर्ता डि. जी. रंगारी यांसह शेकडोंच्या वर सेंदूरवाफा येथील जागरूक महिला पुरुष एक होऊन याला विरोध केला आणि काम बंद पाडले.

“या जागेवर १०० वर्षांपासून गायगोधन होते, नगरपरिषदेने स्थानिक लोकांना विश्वासात न घेता व गड्डे खोदून ऑफलाईन पध्दतीने हे काम भ्रष्टाचाराच्या षडयंत्रात करीत आहे. येथे दररोजच्या बाहेरच्या लोकांनी सर्रास शासकीय जागेवर अतिक्रमणांचे तांडव सुरू असून त्याकडे लक्ष नाही. तरीही शहरात कुठेही मनमर्जीने काम करायचे असल्यास तेथील जनतेला विश्वासात घ्या अन्यथा लोकांचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ”
– राधेश्याम मुंगमोडे • भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्हा सचिव