आता साकोलीत “रियलटाईज” चा अनेकांना फंडातून गंडा..!

105

आता साकोलीत “रियलटाईज” चा अनेकांना फंडातून गंडा..!

वेबसाईटही निघाली खोटी ; कंपनीचे दूरध्वनी “ईनव्हॅलिड” पूर्णतः बंद ; पिडीत महिलेने सांगितली आपबिती •

🔘 साकोली / महाराष्ट्र
03. 08. 2023
आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔘 साकोली : कितीतरी वर्षांनंतर सहारा इंडिया कंपनीतील ठेवीदारांचे रक्कम केंद्र सरकारच्या पुढाकाराने परत मिळण्याची आता आशा व विश्वास निर्माण झाला असतांनाच साकोलीत “रियलटाईज” व “पीएसीएल” इंडिया लिमिटेड अश्या कंपनीचा अनेकांना मासिक फंडातून गंडा होत असल्याचा धक्कादायक व संतप्त प्रकार समोर आला आहे.
🔘 सविस्तर की साकोली जवळील कुंभली/धर्मापुरी निवासी पिडीत महिला राधिकाबाई ( परीवर्तित नाव ) वय ५३ आणि गावातील अन्य २० ते ३० महिला पुरुषांनी सन २०१४ ला “वि रियलटाईज इंडिया लिमिटेड” या खाजगी कंपनीत दरमहा १०० रूपये भरीत गेले. सदर कंपनीच्या पावतीत साकोली ब्रॅंच – २१५, सीएसएस नं. ५०२/२५, रिसीप्ट विषय – इंस्टॉलमेन्ट एक्सेप्ट एक्नॉलॉजमेंट व देयक १०० रू असे असंख्य पावत्या आढळून आल्या. म्हणजेच २०१४ ते २०२१ पर्यंत अनेक गावांतील महिला पुरुषांनी दरमहा १०० रू प्रमाणे लाखोंच्या घरात या कंपनीत आपल्या मेहनतीचा पैसा जमा केला आहे. सदर पिडीत महिला कुंभली गावातीलच या कंपनीच्या मुख्य एजंट महिलेकडे जाऊन पैश्याबाबद विचारणा केली असता त्या एजंट महिलेने सर्व पैसा “डुबले” असे सांगितले. यातच आमच्या साकोली “ग्लोबल महाराष्ट्र” प्रतिनिधीकडे पिडीत महिला आली आणि ही संतापजनक घटना सांगितली. यावर प्रतिनिधीने सदर कंपनीचे पूर्ण कागदपत्रे तपासली. यामध्ये “वी रियलटाईज इंडिया लिमिटेड” रजि. क्रं U66010CT2010PLC022098, कार्पोरेट ऑफीस, एसएल टॉवर्स, वीआई फ्लोअर, अल्फा कमर्शियल बेल्ट – गोल्फ कोर्स समोर, परी चौक – ग्रेटर नोएडा जि. गौतमबुद्ध नगर ( उत्तर प्रदेश ) असून यात फोन क्रमांक नव्हते. पावती वरील दूसरा पत्ता “मधूलिका” बिल्डींग, एक्सिस बॅंक जवळ, ममता नगर चौक, जीई रोड – राजनांदगाव ( छत्तीसगड ) फोन – ०७७४४ – ४०८५२० असे असून या दूरध्वनीवर संपर्क केला असता सदर क्रमांक “ईनव्हॅलिड” आहे असे दर्शविले. पावतीवरील वेबसाईट www.veegroup.in लॉग इन केले असता सदर संकेतस्थळ हे “विजया” टिव्ही चॅनल – मिडीया टिव्ही न्यूज तिरूपती आंध्रप्रदेश यांचे असल्याचे निदर्शनास आले.
🔘 या कंपनीसह अजून “पीएसीएल” इंडिया लिमिटेड रजि. ऑफिस २२, तिसरा माळा, अंबर टॉवर, संसार चांद रोड – जयपूर ( राजस्थान ) व कॉर्पोरेट ऑफिस – ७ वा माळा, गोपालदास भवन, २८ बरखंबा रोड नवी दिल्ली रजि. नं. १७ – ०११५७७ असे नमूद असून यातही कोणताही दूरध्वनी क्रमांक दिलेला नाही. या कंपनीतही सन २००८ पासून कुंभली येथील पिडीत महिला परीवाराचे २५ हजारांवर रक्कम गुंतलेली असून या दोन्ही कंपन्यांनी अनेकांना फंडातून मासिक गंडा देत यांचे दूरध्वनी व संपर्क क्रमांक पूर्णतः बंद झालेले आहेत. सदर कुंभली येथील पिडीतेने ही आपबिती कथन करून “वी रियलटाईज इंडिया लिमिटेड” व “पीएसीएल इंडिया लिमिटेड” समंधित साकोली क्षेत्रात ज्या कुणी मुख्य शाखा समंधित एजंट आणि मध्यस्थी असणा-यांनी तातडीने ४० ते ५० गरीब महिला पुरुषांचे मेहनतीचे पैशे वसूल करण्यासाठी तात्काळ उपाय करावा. अन्यथा सर्व कुंभली येथील पिडीत गुंतवणूकीदारांसह समंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा साकोली येथे पिडीत महिलेने ( ०३ ऑगस्ट ) ला येत आपली प्रतिक्रिया देतांना इशारा दिला आहे.