साकोली NPK विद्यालयात LIC चे वृक्षारोपण

69

📕 एनपीके विद्यालयात भारतीय आयुर्विमेचे वृक्षारोपण •

📕 नागपूर विभागीय प्रमूख यु.सी. मलिक यांचा साकोली दौरा •

📡 साकोली / महाराष्ट्र
Mon. 24. 07. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी | साकोली : आयुर्विमा महामंडlळाच्या नागपुर विभागीय कार्यालय अंतर्गत साकोली शाखेत ( २४ जुलै ) ला विमा क्षेत्रातील नागपुर विभाग प्रमुख अधिकारी वरिष्ठ मंडळ प्रबंधक यु. सी. मलिक यांनी साकोली शाखेत प्रथमच भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश अभिकर्त्यांमधे मध्ये विमा क्षेत्रात पॉलिसी करण्याविषयी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत जीवन विमेचा लाभ देणे हा होता.

🔳 अभिकर्त्यांना भारतीय आयुर्विमा साकोली कार्यालयात व्यवसायाविषयी मार्गदर्शन केल्यानंतर सेकंडरी एजुकेशन सोसायटीच्या नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय मैदानात विमा अभिकर्त्यांच्या उपस्थीत व नागपूर विक्रय प्रबंधक अजय शुक्ला आणि सोबत सर्व साकोली शाखेतील अधिकारी वर्ग, शाळा अधिकारी यांच्या उपस्थीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वरिष्ठ मंडळ प्रबंधक यु.सी. मलिक, नागपूर विभाग विक्रय प्रबंधक अजय शुक्ला व भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखाधिकरी महेश पांढरे, सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे व सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेमध्ये वृक्षारोपण करणे हे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत एक सामाजिक कार्य आहे असे याप्रसंगी यु. सी. मलिक यांनी प्रतिपादन केले. यावेळी नंदलाल पाटील कापगते महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी हजर झाले होते.