साकोली सेंदूरवाफा पूर्ववत ग्रामपंचायत करा • सहा वर्षात साध्या विकासाचा पत्ता नाही.!

59

🛑 साकोली सेंदूरवाफा पूर्ववत ग्रामपंचायत करा ; ६ वर्षांत साध्या विकासाचा पत्ता नाही

🛑 जनतेसोबत केली स्मार्टशहर नावावर फसवणूक [] महामार्ग विभागाचा उड्डाणपूल सोडता काय आहे साकोलीत.? [] ९ जानेवारी २०२१ ला दिले होते हजारोंच्या वर स्वाक्ष-यांसह पत्र

📡 साकोली / महाराष्ट्र
Mon. 17. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी || साकोली : सेंदूरवाफा गावाचा सहभाग साकोलीतून काढून पुनश्च: सेंदूरवाफा व साकोली ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी या १ हजारांच्यावर महीला पुरूष जनतेनी दोन वर्षांपूर्वी स्वाक्ष-यांसह मागील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचे मार्फत ०९/०१/२०२१ ला निवेदन सादर केले होते अन्यथा सेंदूरवाफावासी रस्त्यांवर उतरून आंदोलनाचा इशारा दिला होता, कारण गेल्या ६ वर्षांपासून कोणताच विकास झालेला नसून भरमसाठ शासकीय निधी कोणत्या घशात गेला हा संतापजनक प्रश्ण आजही जनता विचारीत असून स्मार्ट शहर नावावर मतदार जनतेची चक्क फसवणूक झाल्याचे आज जागृत जनतेत बोलले जात आहे.

🔳 साकोली अंतर्गत सेंदूरवाफा गावाचा २०१६ ला समावेश करून नगरपंचायत अस्सीत्वात आणली नंतर शासनन्याय आदेशान्वये व शहरविकासमय प्रगतीवर विशेष शिक्कामोर्तब करीत सेंदूरवाफा गाव साकोली नगरपरीषदेत समाविष्ठ करण्यात आले. पण नगरपरीषद स्तरावरील कोणत्याही सुखसुविधा या सहा वर्षात उपलब्ध झाली नाही, सेंदूरवाफा क्षेत्रात उद्योगधंदे नसताना अकृषक रोजगाराची टक्केवारी ५१% वर दाखवून नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याचे निवेदनात नमूद होते. सेंदूरवाफा क्षेत्रात शेतकरी शेतमजूर जास्त प्रमाणात असून कर टैक्स भरताना आर्थिक संकटाचा सामना करीत आहे, सेंदूरवाफा क्षेत्रात विकासमय कामांचा पत्ता नाही, ठोस निर्माणधीन कामे नाहीत तर या पाच वर्षात काहीच विकास झालेला नसून आता मात्र साकोली व सेंदूरवाफा गावाला पुन्हा ग्रामपंचायत करण्यासाठी सेंदूरवाफा व साकोली येथील दक्ष जनतेनी आक्रमक पवित्रा घेतला असून पाच वर्षांत करोडोंच्या वर आलेला विकासनिधीचे केले काय.? तर संपूर्ण आलेल्या विकासनिधींचा जमाखर्च आमसभा घेत या पुढील नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच साकोली सेंदूरवाफा जनतेसमोर दाखवा असा त्रस्त जनतेचा संतापजनक सुर निघत आहे की सन २०१६ नगरपरिषद निवडणुकीत जाहिरनाम्या प्रमाणे त्यातील कोणतीच विकासकामे मार्गी लावली नाही, मुख्य बाजारपेठेत साधे शौचालय बांधू शकले नाही, नुकतीच तयार झालेली सिमेंट रोडांना उखडण्याचे भ्रष्टमय ग्रहण लागले, कच-यांचे नियोजन करीता सकस आहार येथील घनकचरा व्यवस्थापनेत प्रचंड घोळ आहे, स्मार्टशहर तर दूर राष्ट्रीय महामार्गावर साधे जनता व प्रवाशांसाठी मुत्रीघर बांधू शकले नाही, कुठे गेला प्रत्येक प्रभागातील
सुसज्ज बालोद्यानचा निधी, जून्या शौचालयास रंगरंगोटी करून किती नविन शौचालय शासनाला बांधली दाखविले असे या पाच वर्षात आलेला सर्व करोडोंच्या वर विकासनिधी त्याचा खर्च, अंदाजपत्रकीय बिले, साहित्यमालांची बिले, किती प्रभागात बोअरवेल निर्माण केलीत, बेवारस कुत्र्यांवर मागे ३ लाखांची कशी बिले काढलीत व कुठे लस दिली, उखडलेल्या रस्त्यांवर व अगदी जवळ पाच पाच कशी फायबर स्पिड ब्रेकरचे अतोनात बिले थोपविली, याचा संपूर्ण तपशीलवार माहिती व हिशोब जनतेसमोर पारदर्शकपणे दाखवावी अशी समस्त जनतेत नगरपरिषदेविरोधात या अविकासमय भ्रष्ट्राचार प्रकरणांवर भयंकर चीड निर्माण होऊन काही जागृत जनता जनतेसोबत फसवणूक झाल्याने आता उच्चस्तरीय चौकशीकरीता सर्व तक्रारी देण्यासाठी सरसावले असून साकोली सेंदूरवाफा शहरात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या निर्मित उड्डाणपूल वगळता नगरपरिषदेने काहीच विकास साध्य केलेला नाही असा संतापजनक सवाल आता येत्या नगरपरिषद निवडणुकीपूर्वी जनतेत चांगलाच पेटला आहे हे उल्लेखनीय.
[ 🚫 Warning ⚠️ Do not Copy this Global Maharashtra News Media ]