साकोली नगरपरिषदेत कॉंग्रेसची सत्ता आणणार – क्रिष्णकांत बघेल

60

📕 साकोली नगरपरिषदेत कॉंग्रेसची सत्ता आणनार – क्रिष्णकांत बघेल

📕 साकोली शहर काँग्रेस कमिटीची सभा संपन्न

◾ साकोली / महाराष्ट्र
रविवार – 09.07.2026
रिपोर्ट : आशिष चेडगे | उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी | साकोली : येत्या नगरपरिषद निवडणुकीत
कॉंग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी बुथ कमिटींनी कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या सर्व धर्म सम भावनेतून बळकट करण्याचे आव्हान शहर काँग्रेस निरीक्षक क्रिष्णकांत बघेल यांनी ( ०८ जुलै ) शहर काँग्रेस कमिटीच्या सभेत केले.
साकोली शहर काँग्रेस कमिटी अंतर्गत प्रभाग क. ०७ ची सभा सतिश रंगारी महासचिव यांचे निवासस्थानी शहर अध्यक्ष दिलीप मासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला प्रमूख अतिथी प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितरमारे यांनी कांग्रेस पक्षाची विचार धारा घरा घरात पोहचविन्यासाठी शहर काँग्रेस कमिटी राबवित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या दारी या उपक्रमांची प्रसंशा केली. देशातील केंद्रसरकार शासकिय यंत्रनेचा दुरूपयोग करुन देशात व महाराष्ट्रात अस्थिरता आणत असल्याने केंद्रातील सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सभेत प्रभाग निरीक्षकपदी कॉंग्रेस पक्षाची सक्रीय महिला कार्यकर्त्या शालु नंदेश्वर यांची समन्वयपदी आणि राजेश जुगनाके यांची प्रभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. बुथ क्र.१०५ अध्यक्षपदी सतिश रंगारी, उपाध्यक्षपदी सुनिल सिडाम, बुथ क्र.१०६ अध्यक्षपदी लक्ष्मीकांत उजवने, उपाध्यक्षपदी रुपा आंबेडारे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासुरकर यांच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
सभेचे संचालन शहर काँग्रेस संघटन सचिव दिपक थानथराटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश करंजेकर यांनी केले.सभेला प्रामुख्याने जयश्री भानारकर, माधुरी रासेकर, रुपलता वलथरे, रुपा आंबेडारे, शालू नंदेश्वर, रविंद्र पंचभाई, विशाल गजभीये, कृष्णा हुकरे, संदिप गुप्ता, लक्ष्मीकांत उजवने, नयन पटेल, सचिन राऊत, जावेद शेख, विजय साखरे, दिलीप निनावे, विष्णू रणदिवे, अशोक वलथरे, राजेश जुगनाके, कुलदिप नंदेश्वर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.