साकोलीत एसबीआय समोर दूचाकीचोरांची सीसीटीव्हीत फोटो कैद

88

🛑साकोलीत स्टेट बँक समोरील दूचाकीचोराची सीसीटीव्हीत फोटो कैद

🛑साकोली पोलीस यंत्रणेने केला तपास तीव्र ; चोरांच्या धाडसत्रासाठी विशेष गस्त सुरू

◾ साकोली / महाराष्ट्र
Sun. 18. 06. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी • साकोली : शहरातील मेन रोडवर भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यास गेलेल्या युवकाची दूचाकी चोरीला गेली. बॅंक सीसीटीव्हीत तपासले असता तीच क्रमांकच्या दूचाकीवर बसून एक अनोळखी चेह-याचा व्यक्ती नकली चावी लावून दूचाकी पळवितो. सदर छायाचित्रण सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबद फिर्यादीने साकोली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर की शनिवार १७/६/२०२३ सायं. ६:३० दरम्यान रूनाल तुळशीराम टेंभूर्णे ३५ रा. विर्शीफाटा साकोली हे त्यांची दूचाकी क्रं. एमएच ३६ एन ४१७७ होंडा स्प्लैंडरनी भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधे पैसे काढण्यासाठी गेले. बॅंकेच्या गेटसमोर वाहन उभे करून आतमध्ये जाऊन १० मिनीटानी परत आले तर दूचाकी जागेवर नव्हती. आजूबाजूला शोधाशोध केली पण कुठेही आढळली नाही. यातच रविवार १८ जूनला फिर्यादीने पोलीस ठाणे गाठून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. रूनील टेंभुर्णे व मित्र अनमोल तरजुले, राजू राऊत यांसह भारतीय स्टेट बँकेत जाऊन प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची विनंती केली आणि बॅंकेने मान्यही केली. सदर सीसीटीव्ही फुटेजमधे फिर्यादींनी निरखून पाहिले असता यांच्याच क्रमांकाच्या दूचाकीवर एक ३४ ते ३८ वयोगटातील अनोळखी युवक बसून गाडीला नकली चावी लाऊन भारतीय स्टेट बँकेच्या मागील रस्त्याने पोबारा केला या चोरट्यांसह अन्य दोन जण असून तिघेही मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिशेकडून आले होते असे फिर्यादींनी सीसीटीव्ही फुटेजनुसार सांगितले आहे. साकोली पोलीसांनी गुन्हा नोंद केला असून चोरांच्या बंदोबस्तासाठी तपासचक्रे तीव्र गतीने कार्यान्वित करण्यात आले आहे. यात साकोली पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार जनबंधू अधिक तपास करीत आहेत.