भारतीय आयुर्विमेतून प्रत्येक गोरगरीबांना विमेचा लाभ द्यावा – शाखाधिकारींचे प्रतिपादन

54

🛑भारतीय आयुर्विमेतून प्रत्येक गोरगरीबांना विमेचा लाभ द्यावा – शाखाधिकारींचे प्रतिपादन

🔳साकोलीत पार पडला आयुर्विमा महामंडळाचा सत्कार समारंभ

🕘 साकोली / महाराष्ट्र
SUN. 18. 06. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

📕सविस्तर बातमी साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागातील साकोली शाखेत मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभिकर्त्यांचा साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे व सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांच्या हस्ते ( दि. १६ जून ) रोजी कार्यालयात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारोह प्रसंगी आकर्षणाचा केंद्रबिंदू साकोली शाखेतील विमा अभिकर्ता गोंडउमरी ता. साकोली रहिवासी प्रमोद गजभिये हा ठरला आहे.
प्रमोद गजभिये यांनी ८ जुलै २०२२ ला एल आय सी मध्ये विमा केंद्र घेतले. त्यानंतर मागील आर्थिक वर्षात आयुर्विमा क्षेत्रात जुलै २०२२ पासून मार्च २०२३ या ९ महिन्याच्या अल्पशा कालावधीत अतिशय उल्लेखनीय कार्य करीत ग्रामीण भागातील जनतेच्या १०० विमा पॉलिसी पुर्ण केल्या आहेत. इतक्या कमी कालावधीत एजन्सी मध्ये १०० पॉलिसी पुर्ण केल्याबद्दल त्यांच्या या सफलतापूर्वक कार्याबद्दल त्याचे सर्वच स्तरांवर विशेष कौतुक केले जात आहे. प्रमोद गजभिये हे पत संस्थेत नित्यनिधी संकलन करणारे अभिकर्ता असुन यांच्या जवळ आज पतसंस्थेचे बरेच खाते आहेत. प्रमोद गजभिये यांनी आपल्या नित्यनिधीतून फायदा घेत आयुर्विमा क्षेत्रात प्रवेश केला व आपल्या कौशल्याच्या बळावर गोंडउमरी या भागात नित्यनिधी संकलन माध्यमातून विमा पॉलिसींचा लाभ दिला आहे. त्यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करीत गोंडउमरी भागात आपल्या विमा एजन्सी चा प्रचार करीत ग्रामीण भागातील लोकांना पॉलिसी विषयी सेवा देण्याचे महत्वपुर्ण काम सुरू केले. तसेच गोंडउमरीच्या परीसरातील दहा ते पंधरा किलोमिटर वरील सर्व क्षेत्रातील लोकांना आयुर्विमा विषयी सेवा देण्याचे महत्वपुर्ण कार्य प्रमोद गजभिये यशस्वीपणे पूर्ण करीत असून त्यांच्या या कार्याची चर्चा गोंडउमरी व आजूबाजूच्या क्षेत्रात चर्चा होत आहे. विमा क्षेत्रात प्रमोद गजभिये यांनी स्वतःचे एक लक्ष्य ठरवून नवीन पॉलिसी स्पर्धेत ज्या पद्धतीने कार्य करीत लोकांना विमा सुरक्षा देण्याकरिता पॉलिसी केल्या आहेत ते पाहता साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे व उमेश लिंगलवार यांनी प्रमोद गजभिये यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिनांक १६ जून २०२३ ला झोनल मॅनेजर ट्रॉफी देऊन सत्कार केला.
विमा क्षेत्रातील अवध्या ९ महिन्याचा कमी कालावधीत प्रमोद गजभिये यांना जे यश मिळाले त्याचे श्रेय समुह प्रमुख पुजा कुरंजेकर यांना जाते. त्यांच्या लीडरशिप मध्ये प्रमोद गजभिये यांनी विमा क्षेत्रात प्रगती केली आहे हे विशेष. तसेच प्रमोद गजभिये यांनी आपल्या यशाचे श्रेय ग्रुप लीडर पुजा कुरंजेकर व साकोली शाखेत अभिकर्त्याचा उत्साह वाढविण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका निभावणारे साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे व सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांना दिले आहे. याप्रसंगी प्रमोद गजभिये यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करतांनी शाखा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत प्रामुख्याने उपस्थित होते. किशोर डोंगरे यांनी याप्रसंगी सांगितले की, पत संस्थेत डेली कलेक्शनचे काम करणारे अभिकर्ता विमा क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकतात व अशा अभिकर्त्यांना विमा क्षेत्रात प्रगती करण्यास बराच वाव मिळतो असे प्रतिपादन केले. तसेच सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांनी देखील प्रमोद गजभिये यांची प्रशंसा करीत सांगीतले की, प्रमोद गजभिये हे आता मागील महीन्यात गोंडउमरी येथील पोलिस पाटील झाल्यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढतं आहे त्यामुळे विमा व्यवसाय मध्ये वाढ होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.