.. ज्यांच्या जागेवर केला कब्जा.. त्यांच्याच विद्यार्थ्यांशी नगरपरिषदेचा जीवघेणा प्रकार.

80

🛑ज्यांच्या जागेवर केला कब्जा.. त्याच विद्यार्थ्यांशी नगरपरिषदेचा जीवघेणा प्रकार

🛑साकोलीत हा संतापजनक प्रकार पेटणार ; सर्वात जून्या शाळेवर नगरपरिषदेतील अधिका-यांचा अन्याय

◾ साकोली / महाराष्ट्र
SAT. 17. 06. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज 

📕 सविस्तर बातमी : साकोली : ज्या शासकीय शाळेच्या जागेवर ना हरकत न घेता कब्जा करून शासनाला “आम्ही थुकपॉलीश गार्डन” निर्माण करीत निधीही उचलला व त्यांच्याच शाळेत साधे मुरुम टाकण्याचे सहकार्य न करता उलट “आमच्या हद्दीत ही शाळा येत नाही” म्हणून शेकडोंच्या वर लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणा-या साकोली नगरपरिषदेतील काही अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी समस्त पालक समिती व गणेश वार्ड येथील महिला जनतेने केली आहे.
ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी पंचायत समिती अंतर्गत कन्या शाळा ही आठवडी बाजारात होती. कालांतरानी येथे जवाहर नवोदय विद्यालयही होते. नंतर या ओसाड व पंचायत समितीच्या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ अधिनस्त या जागेवर दिड वर्षांपूर्वी नगरपरिषदेतील अधिका-यांनी कब्जा केला व साधी सुचनाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं ०१ च्या प्रशासनाला दिली नसून ना हरकत प्रमाणपत्रही घेतले नाही. येथे आता नगरपरिषदेने “सुवर्ण महोत्सवी गार्डन” हे निर्माण करून नगरपरिषदेने ही जागा आपल्या कार्यक्षेत्रात घेतली. पण ज्यांच्या जागेवर कब्जा करून गार्डन निर्माण केले त्यांच्याच शाळेत साधे मुरूमही टाकू शकत नाही.? सदर ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ ही गणेश वार्डात आजही स्थित असून येथे २०० जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतून कितीतरी नगरपरिषदेतील अधिका-यांना पत्र गेले की त्यांच्या स्तरावर येथे सपाटीकरण, सौंदर्य व इतर विकासासाठी सहकार्य करावे. पण आता नगरपरिषदेला ही एलर्जी झाली की म्हणतात ती शाळा आमच्या अंडरमधे येत नाही म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही.! त्यांच्या जागेवर कब्जा करता येते.? शहरातील “डोमाजी” ला शासकीय वनहक्क झूडपी वनविभागाच्या जागेवर कब्जा करून परस्पर ३० लाखाला शासकीय जमिनी साध्या नोटरीवर संगनमताने विकता येते.? अतिक्रमण जागेवरील बाहेरच्यांकडून हजारो रूपये दंड आकारून सदर शासकीय जागेवरील कब्जा हा ६० – ६० हजार १ – १ लाखांत साधी नोटरीने विका अशी परवानगी देता येते.? यांच्याच काही आप्तांनी सेंदूरवाफ्यात शासकीय भूखंडावर अतिक्रमणे करून सदर ती जागाच साधी नोटरीने विकून साकोली सोडुन पळून गेले अश्या बाहेरील जागाहडपी पळणा-यांना शह देता येते.? मग जूने व मुख्य साकोली शहरातील प्राचिन शान ऐतिहासिक १९६० स्थापित ब्रिटिशकालीन राजवटातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा ( सेमी इंग्लिश ) क्रं. ०१ गणेश वार्डात साधी डागडूजी करण्यासाठी ऐवढा “हरामखोरीपणा” का.? असा संतप्त सवाल शाळा व्यवस्थापन समितीने केला असून या शाळेत पावसाळ्यात मैदानावर अतिशय चिखल निर्माण होते, वर्गखोल्या जूनाट असून जीर्ण झालेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जूनी दूसरी ब्रिटिशकालीन शाळेचा विकास हा स्थानिक नगरपरिषदेचाही शहरी भाग येत असतो व शासकीय जागेवर स्थानिक फंडातून शालेय शिक्षण परीसरात काही कामेही करता येतात हा नियम काही “अनपढांना” माहिती नाही काय.? तरीही ज्यांच्या जागेवर आता विनापरवानगीने ना हरकत घेता कब्जा करून गार्डन निर्माण केले त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी जीवघेणा प्रकार का.? यावर नगरपरिषदेतील अधिका-यांनी तातडीने हा संतापजनक प्रकारावर अगोदर लक्ष घालून “शाळेची पहिली घंटा” नविन सत्र – २०२४ ( ३० जून ) च्या आधी नगरपरिषदेतील फंडातून पूर्ण मैदानावर ठोस उपाययोजना करावी, जीर्ण व गळणा-या वर्गखोल्यांची संपूर्ण डागडुजी करावी, मैदानावरील पावसाळ्याचे पाणी हे गमन मार्गाची व्यवस्था करावी, मैदानावर स्तरीय भरणा टाकून काळ्या चूरीने सपाटीकरण करावे, महिला व पुरुष प्रसाधन गृहांची पूर्ण डागडुजी करावी हे सर्व मागण्या “शाळेची पहिली घंटा” ३० जून अगोदरच पूर्ण करावीत अन्यथा नगरपरिषदेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लीना चचाने, सदस्य हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, अनिल तिडके, विनायक देशमुख, अमित लांजेवार, रामदास आगाशे, संजय डुंभरे संपूर्ण पालकवर्ग आणि गणेश वार्ड येथील नागरिकांनी दिला असून सर्वात जून्या ब्रिटिशकालीन शाळेच्या विकासाला जो विरोध व टाळाटाळ करेल अश्यांना गणेश वार्डातील शाळा परीसरात येऊही देणार नाही असा इशाराही पालकांनी दिला असल्याने मुख्य व जूने साकोली शहरात सदर रास्त व हे विद्यार्थींच्या हितासाठी प्रकरण पेटणार आहे हे निश्चित.

🔊 यांचे म्हणणे आहे –
” नगरपरिषदेनी जिल्हा परिषदेच्या मालकी जागेत लूडबूड व हस्तक्षेप करू नये, यांनी जूने कन्या शाळा जागेवर गार्डन निर्माण करतांना आम्ही पत्रही दिले होते आणि यांनी कोणतीच प्रकारची ना हरकत घेतलेली नाही, कधीही सदर जागा जिल्हा परिषद आपल्या मालकी हक्कात घेऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शासकीय जागा व भूखंड अबादित रहावे त्यावर कोणतेही अतिक्रमणे करू नये. नगरपरिषदेनी जिल्हा परिषदेच्या जागेवर कब्जा केला तर त्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोडे सहकार्य दाखविण्याचा मोठेपणा दाखवावा. अन्यथा जिल्हा परिषद प्रशासनाकडून योग्य ती कारवाईही केली जाईल व सदर जागा विनापरवानगीने आणि ना हरकत प्रमाणपत्र न घेता कब्जा केला आहे तर केव्हाही आपल्या हक्कात ती जागा घेऊ शकतो असा नियमच आहे “

📕 मदन रामटेके – जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती जि. प. भंडारा