मानवाधिकाराचे हनन…जनता सनन.

70

📕मानवाधिकाराचे हनन..जनता सनन.

[ ग्लोबल संपादकीय ]

◾साकोली / महाराष्ट्र
14. 06. 2023
◾आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

📕 “मानवाधिकाराचे हनन..जनता सनन” या साकोली संपादकीय लेखणीद्वारे ज्या ज्या वरिष्ठांपर्यंत हा संपादकीय लेख गेला असेल व जाणार असेल त्यांनाही आवर्जून नवल वाटेल की ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी तहसील साकोलीचा विकास हा कसा काय नाही झाला.? त्याचेच हे उत्तर..!
इंग्रजकालिन राजवटातील असलेली तहसिल साकोलीची मुख्य व जूनी प्रशासकीय वस्ती म्हणजे “सिव्हिल वार्ड – गणेश वार्ड – तलाव वार्ड” येथूनच अख्ख्या देसाईगंज, देवरी, सडक अर्जूनी, मोर. अर्जूनी, लाखनी, लाखांदूर आणि परीसरातील जनतेचा संपर्क होता व भंडारा – गोंदिया मुख्यालयी साकोलीत येणे पसंत करीत होते. कारण येथील दिवाणी न्यायालय ब्रिटिशकालीन राजवटातील जिल्ह्यातील सर्वात जूने न्यायालय होते. प्राचिन व इंग्रजकालिन तहसिल कार्यालयाची दगडांची मजबूत वास्तू, जूने पंचायत समिती आवारात १९४७ च्या स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्या व बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे “अशोक चक्र” स्मारक आहे. उपजिल्हा रुग्णालयात आजही प्राचिन असे स्मारक अजून शाबूत आहे. साकोलीचे आराध्य दैवत संत श्री लहरीबाबांचा मठ हे मुख्य साकोली शहरातील भक्तांचे आराध्य दैवत आहे. याबरोबरच सेंदूरवाफा ही साकोलीतील मुख्य व मोठी वस्ती होती त्यामध्ये सुंदर निसर्गछटा असलेली निसर्गरम्य पहाडी आजही दोन्ही शहरांची अतुल्य शोभा आहे. काय नव्हते साकोलीत.? जागा होती, सामर्थ्य होते, आणि विशेष म्हणजे मतदार जनतेचा साथ होता..! नुकत्याच विसर्जित नगरपरिषदेने जर शुद्ध व पारदर्शक मन ठेऊन कुठलिही कपटी भावना न ठेवता जर विकास केला असता..तर ही साकोली आजची निसर्गरम्य रामटेक नगरपरिषदेपेक्षाही अव्वल राहिली असती..! काय निधी नव्हता आला.? सर्व आला होता. पण येथील जनता कितपत शांत आहे व काय केल्यानी आणि किती देऊन शांत राहिल व त्याचाच मनमुरादपणे गैरफायदा घेऊन स्वतः चा स्वार्थ पाहिला गेला आहे व आताही नगरपरिषदेत हेच सुरू आहे व हे आज काही जागृत झालेली शिक्षित जनताच बोलत आहे. काहींनी तक्रारीही केल्या, छापून जनतेसमोर आणायचे काही जिगरबाजांनी धमकही दाखविली, सुजाणांनी अनेक विषयांवर माहिती अधिकारात माहितीही मागितली पण तेही टाळाटाळ.. कारण “घबाड खादाड पुरस्कार हातात येईल ना” सर्व जनहक्काची कागदपत्रे झाली सेटींगनी “पेन्डींग”…! यालाच म्हणतात मतदार जनतेच्या मानवाधिकाराचे हनन..!
दूसरे भक्तांचे हनन आता देवालयाकडे प्रकरण गेले असून नुकतेच येथील आराध्य दैवत संत श्री लहरीबाबा मठ देवस्थानानात सर्व जनतेनी मनात अपार श्रद्धा ठेऊन व गोरगरीबातला गरीबाने काही ना काही सढळ हाताने मदत दिली ती आराध्य दैवत संत श्री लहरीबाबा यांच्या पुण्यभूमीला पाहून..! पण येथील नुकतेच पावती गहाळ प्रकरणे समोर आलीत. लोकांनी दान दिलेल्या पैश्यातून अशी अफरातफर पाहून मूळचे साकोली शहरातील काही जागरूक भक्त सदस्यांनी हे प्रकरण जिल्हा न्याय विभाग स्थळी नेले. आणि शहरातील दोनच वृत्त व मिडीयाने सदर प्रकरण हे जनतेसमोर आणले होते जेणेकरून जनतेलाही कळेल की आजच्या लूटमार युगातही देवीदेवतांच्या पैश्यांवरही काहींचा डोळा असतोच..! त्यावर जनतेच्या अनेक प्रतिक्रियाही आल्या की हे कसं काय झालं.? की ज्या श्री संत लहरीबाबांच्या पावन भूमीत लाखोंच्या वर भक्तभाविकांचा महाप्रसादासाठी जनसागर उसळतो व येथे अन्न कधीच कमी पडत नाही व आजपर्यंत बाबांच्या आशीर्वादाने तो प्रसाद कमी गेलाही नाही..! तेथे असा घृणास्पद प्रकार घडलाच कसा.? आणि ज्यांनी घडविला त्यांना त्या पवित्र जागेवर पुन्हा पुन्हा विश्वस्त बसू नये करीता श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही त्या जागृत भक्तांनी केली व सुरूच आहे. यावर प्रशासनाच्या अधिका-यांना थोडीही आस्थेबद्दल श्रद्धा नाही का.? की देवीदेवतांचे धार्मिक ट्रस्टच्या आणि भक्त जनतेच्या पैश्यांची हेराफेरी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही काय..? दूसरीकडे सदर प्रकरण काही जिगरबाज जागृतांनी “छापू” नये यासाठी इतरांनी कितीतरी फिल्डींग लावली होती पण ती व्यर्थ ठरली आणि सत्य जनतेसमोर आलेच. तक्रारदार जागृत भक्तांनी कितीतरी तक्रारी केल्यात पण काय झाले..? चौकशी थंडबस्त्यात… तक्रार पत्रके कचरा डब्यात..! यालाच म्हणतात भक्त जनतेच्या मानवाधिकाराचे हनन..! आणि यालाच म्हणतात साकोलीच्या शांतमय जनतेचे हनन..! की या शहरात काहीही करा… घनकचरा निविदा लपून करा अथवा घंटागाड्या टैंकरे लपून व जनतेला माहिती न देता आणा किंवा कोणतेही जनप्रत्रके निविदा सूचना अथवा जाहिराती भित्तीपत्रकांवर व दर्शनीय भागात लाऊ नका किंवा सर्रास शासकीय जागाच परस्पर विकून खा..! कुणी काहीच म्हणणार नाही. कारण प्रसिद्ध मराठी अभिनेता नाना पाटेकर यांच्या “क्रांतिवीर” चित्रपटातील एक डॉयलॉग “येअपने देश मे छोटी सी सुई नहीं बना सकते साले.. और हमारा देश तोडने की बात करते है…वो ये क्यूं करते है की उन्हे पता है की ये मूर्दो का देश हैं” व हेच फेमस वाक्य आज साकोलीवर ओढावले आहे. तात्पर्य की आज प्रत्येक शिक्षित युवकांनी विशेष करून मुख्य साकोली शहरातील याकडे विशेष लक्ष घालायला पाहिजे व मनात पारदर्शक स्वच्छ भावना ठेवून आपल्या साकोलीचा विकास आता कसा होईल त्यासाठी स्वच्छ मनाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे यात मनात कपटीपणा खादाडपणा नसावा आणि मी शहरासाठी काय करणार व करून दाखविणारच आहे हे अगदी ठरवून त्याचे विकास आराखडा चित्र डोळ्यासमोर आणून स्वच्छ मनाने जर काम केले तर ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी तहसील साकोली गावं हे मात्र शहर बनू शकेल..! अन्यथा मागीलप्रमाणे पुन्हा “खोडदिमाख” लावल्यास आजच्याच गावासारखी गटग्रामपंचायत उपाधी दिलेली साकोली हे आजचे गावं हे अखेर गावच राहिल हे नक्की..!