राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले परवानाधारक देशी दुकानांनी आव्हान..!

69

🛑राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले परवानाधारक देशी दुकानांनी आव्हान.!

🛑एका महिन्याला एक लाख 75 हजार रुपयाची वरकमाई

साकोली / महाराष्ट्र
SUN. 11. 06. 2023
• उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

📡 सविस्तर बातमी : साकोली : शहरात एक नविनच मद्य घोटाळा पुढे आला आहे. शासनाच्या निर्धारीत दरापेक्षा १० रू. अतिरिक्त वसुल करून महिन्याकाठी पावणेदोन लाख रूपयांची वर कमाई होत असल्याचे प्रकरण आता बाहेर आले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागालाच परवानाधारक मद्य दुकानदारांनी एक प्रकारचे आव्हान दिले आहे. मात्र या प्रकरणाला आता दोषी कोण यावर मात्र साकोली मध्ये चर्चा सुरू आहे.या अतिगंभीर प्रकरणाकडे साकोली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष का नाही. असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे.
सविस्तर असे की महाराष्ट्र शासन उत्पादन शुल्क विभागानुसार सर्व करांसह एका पावटीची किंमत ही ७०/- रू व छोटी ९० एम एल शिशीची किंमत ही ३५/- रू विक्री निर्धारित करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी एमआरपी विक्री नियमाला चक्क धाब्यावर बसवून एक नीप ८० रू ला तर ९० एमएल शीशी ४५ रू ला सर्रासपणे विकली जात आहे. निर्धारित किंमतीपेक्षा जास्त रूपयांने मद्य विकणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. सरासरी अंदाज लावला असता एका दिवसात एका चिल्लर दारू विक्री दूकानात अंदाजे ( १८० एमएल पावटी व ९० एमएल धरून दोन्ही ) ७५० नग जवळपास विकले जातात. यात प्रतिदीन ७५० × १० रू ( अतिरिक्त ) = ७,५०० रू एका दिवसाचे, ७,५०० × ३० ( दिवस – १ महिना ) = २,२५,००० असा एका दूकानाचा महिन्याचा हिशोब आहे. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानुसार सहा महिन्यात १ प्रकरण बनवावी लागतात यातून २ लाख २५ हजार – ५० हजार ( दंड व कारवाई प्रकरण एलसीबी ) = १ लाख ७५ हजारांचा एका दूकानाचा हिशोब निघत आहे, तर साकोली शहरात दारू विक्री दूकानातून निर्धारीत दरापेक्षा जास्त किंमतीचा आर्थिक आय येत असतो. हा एक राज्य उत्पादन शुल्क विभागाला आव्हान देणारा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याला सर्वात जास्त महसुलात उत्पादन शुल्क विभाग अव्वल स्थानी असून मद्य विक्री ही शासकीय निर्धारीत दरापेक्षा जास्त रूपयांनी विकणे हा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागानुसार गुन्हा नाही का.? भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभाग या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देतील काय? हा संतापजनक प्रकार कितीतरी वर्षांपासून शहरात सर्रासपणे सुरू आहे. साकोली राज्य उत्पादन शुल्क विभागाला कल्पना नाही असे कसे म्हणता येईल ? यावरून असे लक्षात येते की संगममताने शासकीय निर्धारीत दरापेक्षा जास्त रूपयांनी मद्य विक्री करणे या नियमबाह्य प्रकाराला समंधित विभागच खतपाणी घालत आहे.