साकोलीत चक्क पेट्रोल पंपावरच लावली आग..मोठी जिवीतहानी झाली असती तर….

61

🛑पेट्रोल पंपावरच लावली आग ; भयंकर धोका झाला असता तर..?

🛑साकोलीत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा महाप्रताप • शहराच्या मध्यभागीच आहे पेट्रोल पंप

◾ साकोली / महाराष्ट्र
09. 06. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : पेट्रोलियम मंत्रालयाच्या अति ज्वलनशील पदार्थ सुरक्षा अधिनियमानुसार पेट्रोल पंप परीसरात साधी उदबत्तीही पेटविणे हा नियमबाह्य प्रकार असून साकोली शहरात भल्या पहाटेच पेट्रोल पंपावर ज्वलनशील संपर्क जागेवरच मोठ्या कच-याला ढिगाला तेथील कर्मचाऱ्यांनी आग लावली. सदर अतिसंवेदनशील व धोकादायक प्रकाराने मोठी आगीची झळ इतरत्र परीसरात जाऊन पेट्रोल साठवण टाकीच्या संपर्कात आले असते तर या मध्यवर्ती साकोली शहरात नागरी रहिवासी वस्तीत फार मोठी दूर्घटना व्हायला वेळ लागला नसता. व मोठी जिवीतहानी झाली असती तर याची जबाबदारी कुणी घेतली असती अश्या बेजबाबदार व जनतेच्या जीवाशी खेळणा-या पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची मागणीही सकाळी फिरायला जाणारे नागरीकांनी केली आहे.
सविस्तर की, शहरातील मुख्य रोड नागझिरा चौकात मे. मोदी पेट्रोलियम आहे. दि. ०९ जून २०२३ शुक्रवार पहाटे ०५ : १७ ला या पेट्रोल पंपाचे ऑफीस बाजूलाच काही कर्मचाऱ्यांनी भला मोठ्या कच-याच्या ढिगास पेटवून दिले. त्याच्या आगीचे आगडोंब वरपर्यंत उसळत होते. जवळच पेट्रोल सप्लाय मशीन अगदी २५ ते ३० फूटावर होती आणि पेट्रोल डिझेल साठवण जमिनीगत टाकी ही ऑफिसच्या डाव्या बाजूला म्हणजे ३५ ते ४० फूटावरच होती. अनावधानाने पेट्रोल रोधक संपर्कात आगीचे आगडोंब जर हवेनी उडत जाऊन थेट साठवण टाकीच्या संपर्कात आग लागली असती तर मोठी स्फोटक जिवीतहानीची घटना या मध्यवर्ती साकोली रहिवासी परीसरात घडली असती असे सकाळी फिरायला जाणारे नागरीकांनी प्रतिक्रिया दिल्यात. पेट्रोल पंपावर साधी उदबत्ती, माचिस डबी किंवा इतर ज्वलनशील पदार्थ बाळगणे, वापरणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाच आहे. परंतु या पेट्रोल पंपावर तर अश्याच प्रकारे नेहमी कचरा पेटवून नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला जात असेल. त्यातच भयंकर आगीची घटना या शहरी भागात केव्हाही व रात्री बेरात्री घडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार.? असा संतापजनक सवाल प्रभात पावली जाणारे नागरीकांनी केला असून अश्या जनतेच्या जीवाशी खेळणा-या पेट्रोल पंपावर अनियमितता, सुरक्षा नियमांचे धिंडवडे काढून चक्क ज्वलनशील व आग प्रतिबंधक परीसरात आग लावणे प्रकारावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

• Warning Do not 🚫 Copy this News Global Maharashtra News Media