मला न्यायासाठी का भटकावे लागत आहे.? न्याय न मिळाल्यास कालिदास यांचा उपोषणाचा इशारा.

72

📕 मला न्यायासाठी का भटकावे लागत आहे.? न्याय न मिळाल्यास “कालिदास” यांचा उपोषणाचा इशारा

◾ साकोली / महाराष्ट्र
दि. 03. 06. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : माझ्या वडीलोपर्जित जागा हडपण्यासाठी मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असून याबाबद मी अनेकदा तक्रारी करूनही मला न्याय मिळेल का.? माझे मानसिक संतुलन ढासळत असून माझ्यासोबत माझे हक्काचे न्याय न झाल्यास मी आमरण उपोषणाला बसण्याची तयारी दर्शवितो असे प्रेस नोट्स देत सानगाव येथील कालिदास देशमुख यांनी इशारा दिला आहे.
मौजा सानगावं येथील कालिदास लक्ष्मण देशमुख वय ५३ यांची सानगाव पो. सासरा येथे वडीलोपर्जित जागा हडपण्यासाठी गैरअर्जदार डुडेश्वर देशमुख, पुरूषोत्तम देशमुख व इतरांनी संगनमत करून माझी जमिन हडप करण्यासाठी विविध डावपेच आखित आहेत. मी कित्येकदा तक्रारी करूनही मला न्याय मिळेल का.? मागे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी पत्र क्रं. पंससा/पंचा/विकट/७६५/२०२३ हे २८ मार्च २०२३ ला ग्रामपंचायत सचिव सानगावं यांना चौकशी अहवाल सोबत पाठवून कार्यवाही करीत अनुपालन अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. त्याचबरोबर २४ एप्रिल २०२३ ला पोलीस ठाणे साकोली येथे कालिदास देशमुख यांनी त्यांची जागा हडपण्यासाठी गैरअर्जदाराविरूद्ध तक्रारी पण दाखल केले. यांनी मागणी केली आहे की माझ्या जागेवर ज्यांनी बेकायदेशीर कब्जा केला त्यांवर कारवाई करण्यात यावी. व शासनाकडून मला तातडीने न्याय देण्यात यावा. अन्यथा मी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे असा प्रेस नोट मधून कालिदास लक्ष्मण देशमुख सानगाव यांनी इशारा दिला आहे.