• साकोलीत स्टेडियमचे स्वप्न.. अतिक्रमणे मोडणार..!

48

🛑वाढत्या अतिक्रमणामुळे साकोलीतील स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्सचे स्वप्न भंगणार.?

🛑२ कोटींचा निधी हस्तांतरण अभावी धूळखात ; साकोली होमगार्ड परेड ग्राऊंडवर पक्क्या अतिक्रमणाचा सपाटा

📡 साकोली / महाराष्ट्र
21. 05. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

⭕ सविस्तर बातमी • साकोली : शहरातील सामुहिक शासकीय ध्वजारोहण व राष्ट्रीय कार्यक्रमांचे नियोजित स्थळ म्हणजे होमगार्ड परेड मैदानावर सहा वर्षांपूर्वी येथे स्टेडियम व बाहेरून शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी २ करोड रुपये मंजूर होऊन निधी धूळखात पडला आहे या विलंबाचा गैरफायदा घेत येथे आता अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करीत हळूहळू शासकीय जागा गिळंकृत करण्याचा सपाटा चालविला आहे. अखेर हे स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्सचे साकोलीकरांचे स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासक तातडीने लक्ष देतील काय.? असा प्रश्न सामान्य जनतेनी उचलला आहे.
शहरातील होमगार्ड परेड मैदानावर गणराज्य दिन २६ जानेवारी आणि स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला तहसिल प्रशासन, पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे मुख्य ध्वजारोहण येथे होत असते. येथे पोलीस दलाची मानवंदना परेड तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयांची देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात. या सर्वात जुन्या शासकीय स्थळावर आतून स्टेडियम व बाहेरून व्यापारी कॉम्प्लेक्सकरीता सन २०१५ पासून नगरपंचायत असतांनीच प्रस्ताव मंजूर होऊन २ कोटी रुपये निधी मंजूर झाले होते पण सदर जागा नगरपरिषदेला आजपर्यंत हस्तांतरित झाली नसल्याने तो निधी आजही सार्वजनिक बांधकाम विभागात सहा वर्षांपासून जैसे थे पडून आहे व या स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्सचे साकोलीकरांचे स्वप्नही ६ वर्षांपासून धूळखात पडून आहे. याचा उद्देश हा होता की प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला मधोमध ध्वजारोहण व स्टेडियमच्या आत बैठक गैलरीत प्रेक्षकांना कार्यक्रम बघता यावा आणि बाहेर शॉपिंग कॉम्प्लेक्समधून भाड्यांचे दूकानातून शासनाला महसुलही येईल. परंतू ६ वर्षांपासून ही स्थिती जैसे थे असून याचा गैरफायदा उचलून काही अतिक्रमणधारकांनी या परीसरात अतिक्रमण करणे सुरू करून आता तर पक्के बांधकाम पर्यंत यांनी मजल मारलेली आहे. या परीसरात आणि तलावाजवळील शासकीय जागा तर काहींनी अतिक्रमणांत टिने ठोकून ती शासकीय जागाच स्टॅम्प पेपर लिहित साधी नोटरी करून ६० ते ८० हजार व १ लाखात इतरांना परस्पर विकल्याचीही ताजी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. शासकीय भूखंड अथवा जमिन विकणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा व शासनासोबत फसवणूक असूनही याकडे नगरपरिषदेतील अधिका-यांचे लक्ष का नाही.? असे किती शहरातील शासकीय भूखंडावरील, झुडपी वनजमिनीची मोठ्या महाविद्यालयांनाही परस्पर जागा विकून साकोली सोडुन पळून गेले व आताही तोच प्रकार नविन बस स्थानक, प्रगती कॉलनी, सेंदूरवाफा, तलाव जवळील जागा, विश्राम गृह परीसर, नागझिरा अभयारण्य रोड व महामार्ग सर्व्हिस रोडवर सुरू असून याकडे दुर्लक्ष का.? यावरही जनतेने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत याला थारा देत बदली झालेले ते कोण कोण अधिकारी असाही संतापजनक प्रश्न जनता आज उपस्थित करीत आहेत.
सदर परीसरातील आणि शासकीय कार्यक्रमांसाठी असलेले होमगार्ड परेड मैदानावरील अवैध अतिक्रमणे तातडीने काढून साकोलीकरांच्या स्वप्नातील स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम हे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेतील प्रशासकांनी त्वरीत निकाली काढण्यासाठी या भागात वाढत्या अतिक्रमणांवर व जागा विकणा-यांवर कारवाई करून ठोस उपाययोजना करावी. सदर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित बाबदची कारवाई पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा असलेला २ करोड निधीतून येथे स्टेडियम शॉपिंग कॉम्प्लेक्सचे लवकरात लवकर निर्माण सुरू करावे अशी येथील सामान्य जनतेनी रास्त मागणी आता जोर धरू लागली आहे.