• कर्नाटक रणविजय बघता आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार – प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले

67

🛑आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

🛑साकोलीत पदाधिकारी पदग्रहण सोहळा व कामगारांना सुरक्षा किटचे वाटप 

📡साकोली / महाराष्ट्र

08. 05. 2023

रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

 

⭕सविस्तर बातमी • साकोली : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तेथील सुजाण शिक्षित पण त्रस्त झालेल्या नागरिकांनी भाजपाला दाखवून दिले की कॉंग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून कदापि गोरगरीब जनतेवर अन्याय होतांना खपवून घेत नाही व कर्नाटक विधानसभेत जनतेने कॉंग्रेस पक्षालाच स्पष्ट बहुमत दिले आणि त्याचीच प्रचिती आता महाराष्ट्र विधानसभेच्या आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत येथील महागाईने त्रस्त व अन्याय सहन करणारी समस्त जनता भाजपाला धडा शिकवून विधानसभा व नगरपरिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवतील असे प्रतिपादन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व साकोली आमदार नाना पटोले यांनी साकोलीत ( दि. १७.मे.) रोजी कॉंग्रेस पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याला भाषणात सांगितले.

साकोली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या तालुक्यातील नवनियुक्त पक्ष पदाधिकाऱ्यांचा पदभार ग्रहण समारंभ तसेच सत्कार समारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने पक्षाचा कणा असतो, नव्या पिढीत नवे कार्यकर्ते येत आहेत, त्यांच स्वागत केल पाहिजे. मात्र जुन्या लोकांबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे. असेही मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात कामगार संघटना जिल्हाध्यक्ष ( के.के.सी.भंडारा ) मार्कंडराव भेंडारकर यांच्या प्रयत्नाने व आमदार नाना पटोले यांचे हस्ते सर्व बांधकाम क्षेत्रातील काम करणारे व विविध योजनांची त्यांना माहिती देऊन कामगारांना सुरक्षा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कॉंग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, भंडारा जिल्हा असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष मार्कंडराव भेंडारकर, जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर, मधूकर लिचडे, जि.प. सभापती मदन रामटेके, साकोली तालुका कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. अशोक कापगते, शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर, साकोली तालुका व शहर पदाधिकारी डॉ. दिपक मेंढे, हरगोविंद भेंडारकर, इंजि संदीप बावनकुळे, छाया पटले, महिला अध्यक्ष पुष्पा कापगते, उमेश कठाणे, दिलीप निनावे, नयन पटेल, जावेद शेख, ओम गायकवाड, जे.डी. मेश्राम, हेमंत भारद्वाज, विक्की राऊत, विनायक देशमुख, विजय दूबे, उमेश भुरे, स्वीय सहायक उमेश भेंडारकर, मिडीया प्रमुख आनंद नागोसे, कामगार प्रतिनिधी आदित्य चेडगे, नेपाल कापगते व सर्व सन्माननीय सदस्य तालूका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला कॉंग्रेस, एनएसयुआय, कॉंग्रेस ओबीसी सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्याला संचालन कॉंग्रेस शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर यांनी तर प्रास्ताविक तालुका कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. अशोक कापगते यांनी केले तर आभार छाया पटले यांनी मानले