उपराजधानीत सन्मानित ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांचा साकोली पोलीस ठाणे येथे सत्कार..

79

उपराजधानीत सन्मानित ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांचा साकोली पोलीस ठाणे येथे सत्कार

साकोली / महाराष्ट्र
20. 04. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

सविस्तर बातमी – साकोली : नुकतेच व्हॉईस ऑफ मिडीया विदर्भ विभागातील पत्रकारांचे एकदिवसीय अधिवेशन १६ एप्रिलला नागपुर येथे संपन्न झाले. त्यात साकोली क्षेत्राततील ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांना सन्मानित करण्यात येऊन गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.

Read more news 👇👇👇


भंडारा अर्बन बँकेच्या सहा संचालकांचे अचानक राजीनामे ; लेखापालला दिले ८० लाख


 

 

याबद्दल साकोली पोलीस ठाणे येथे ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांचा सत्कार करण्यात आला.
व्हॉईस ऑफ मिडीया विदर्भ विभागातील पत्रकारांचे एकदिवसीय अधिवेशन गेल्या रविवारी १६ ला किंग्स वे ऑडिटोरीयल ( परवाना भवन ) कस्तुरचंद पार्क नागपूर येथे संपन्न झाले. येथे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व उपस्थित मान्यवरांनी साकोली क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांना सन्मानित करण्यात येऊन गौरवचिन्ह बहाल करण्यात आले. रमेश दुरूगकर हे दैनिक सकाळ वृत्तसेवा बातमीदार असून सामाजिक व भ्रष्टाचाराच्या विरोधात रोखठोक लिखाणाचे निर्भिड पत्रकार समजले जातात. त्यांच्या या नागपूर येथे व्हॉईस ऑफ मिडीया कडून सन्मानाबद्दल साकोली पोलीस ठाणे कडून निरीक्षक राजेश थोरात यांनी ( २० एप्रिल ) रमेश दुरूगकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दै. सकाळ प्रतिनिधी मनिषा काशिवार, दै. युवाराष्ट्र दर्शन प्रतिनिधी आशिष चेडगे, न्यूज मिडीयाचे राशिद कुरैशी, पोलीस नायक अमितेश वडेट्टीवार, संजय पाटील, राजेश भजने, स्वप्निल गोस्वामी आणि सर्व पोलीस कर्मचारीवृंद उपस्थित होते.