साकोलीचे ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर नागपुरात “व्हॉईस ऑफ मिडीया” कडून सन्मानित

82

साकोलीचे ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर नागपुरात “व्हॉईस ऑफ मिडीया” कडून सन्मानित

नागपूर येथे विदर्भ विभाग एकदिवसीय अधिवेशन संपन्न

भंडारा / महाराष्ट्र
17. 04. 2023
रिपोर्ट / आशिष चेडगे • सहसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • नागपूर / साकोली : व्हाईस ऑफ मिडीया नागपूर विभागाचे पहिल्यांदाच विदर्भातील पत्रकारांचे एकदिवसीय अधिवेशन [ रवि.१६.] एप्रिलला नागपुर येथील किंग्ज वे ऑडिटोरीयल ( परवाना भवन ) कस्तुरचंद पार्क किंग्स वे येथे पार पडले. यात विदर्भातील सर्व प्रिंट व डिजीटल मिडीयाचे पत्रकार हजर होते. अधिवेशनात साकोली उपजिल्हा क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांना सन्मानित करून “व्हॉईस ऑफ मिडीया” गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.

Read more news 👇👇👇


साकोलीत २० युवकांनी स्वेच्छा रक्तदान करीत स्व. अर्जून सोनकुसरे यांना वाहिली श्रद्धांजली



सदर अधिवेशनात प्रमुख अतिथी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, लोकसत्ता समुहाचे देवेंद्र गावंडे, व्हॉईस ऑफ मिडीया राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, अधिवेशन संयोजक आनंद आंबेकर, लोकमत जिल्हा प्रतिनिधी भंडारा गोपालकृष्ण मांडवटकर, व्हॉईस ऑफ मिडीया भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू परसावार आदी उपस्थित होते. अधिवेशनात पत्रकारिता क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चासत्र आणि ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शनही झाले. भंडारा जिल्ह्यातील साकोली उपजिल्हा क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांचा यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व हजर अतिथींनी सत्कार करीत गौरवचिन्ह देत सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर यांना उपराजधानी नागपूर येथे व्हॉईस ऑफ मिडीयाचे गौरवचिन्ह प्रदान केल्याबद्दल साकोली क्षेत्रातील पत्रकार बंधू आश्विन नशिने, व्हॉईस ऑफ मिडीया साकोली तालुका अध्यक्ष व दै. भंडारा पत्रिका चे नाजिम पाशाभाई, दैनिक सकाळ च्या मनिषा काशिवार, आकाशतरंग सहसंपादक रवि भोंगाणे, लोकमतचे संतोष कोरे, दैनिक युवाराष्ट्र दर्शन व ग्लोबल महाराष्ट्र न्यूजचे आशिष चेडगे, दै. पुण्यनगरीचे ऋग्वेद येवले, चेतक हत्तीमारे, बिलाल भुरा, सचिन तिडके आदींनी सकाळ वृत्तसेवा बातमीदार रमेश दुरूगकर यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात.