साकोलीजवळ बिबट बछड्याला अज्ञात वाहनाची धडक ; झाला मृत्यू

116

साकोलीजवळ बिबट बछड्याला अज्ञात वाहनाची धडक ; झाला मृत्यू

साकोली / महाराष्ट्र

दि. 19.03.2023

रिपोर्ट:- आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज 

सविस्तर बातमी साकोली : शहरातील जवळच मोना टायर इंड्रस्ट्रीज समोर महामार्गावर १९ मार्च पहाटे दरम्यान बिबट बछडा रोड ओलांडून जात असता अज्ञात वाहनाची धडक दिल्याने जागीच बछड्याचा मृत्यू झाला.

सविस्तर की १९ मार्च सकाळी ६ दरम्यान बिबट बछडा राष्ट्रीय महामार्ग उत्तरेकडून दक्षिणेकडे रोड ओलांडून जात असता अज्ञात ट्रकने त्यास चिरडले त्यातच डोक्यावरून ट्रकचा टायर गेल्याने जागीच बछड्याचा मृत्यू झाला. याची माहिती फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांना प्रथम मिळताच त्यांनी साकोली मिडीयाला घटनास्थळी नेले आशिष चेडगे यांनी तातडीने पोलीस ठाणे येथे फोन करून कळविले तर पोलीसांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. घटनास्थळी वन अधिकारी दाखल झाले असून मृतदेह बाजूला घेत शासकीय शवविच्छेदन अहवाल यंत्रणा सुरू आहे. सदर बिबट बछडा हा किमान १ वर्षाचा असून जंगलमार्गानी अन्नशोधात भरकटत महामार्गावरील परीसरात आला होता असा अंदाज आहे.