साकोलीत शिक्षक आमदारांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार समारंभ संपन्न.

106

साकोलीत शिक्षक आमदारांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार समारंभ संपन्न

मार्तंडराव पाटील कापगते महाविद्यालय जांभळी सडक येथे आयोजन

साकोली / महाराष्ट्र
दि. 11. फेब्रुवारी 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी साकोली : येथील मार्तंडराव कापगते महाविद्यालय जांभळी/स. प्रांगणात ( १३. फेब्रु.) ला माजी शिक्षक आमदार व्हि.यु. डायगव्हाणे यांचा अमृत महोत्सव सपत्निक सत्कार आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचाही सपत्निक सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.

साकोली तालुका काँग्रेस कमिटी व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ वतीने या सत्कार सोहळ्याला अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश डहारे, जिल्हा कार्यवाह वि.मा.शि. राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष विज्युक्टा मार्तंडराव गायधने, जिल्हा अध्यक्ष वि.मा.शि. सुधाकर देशमुख, जि.प.स. नारायण वरठे, श्रीधर खेडीकर, जिल्हा अध्यक्ष जूने पेंशन संघ संतोष मडावी, कार्याध्यक्ष निर्मला भोंगाडे, सिमा अडबाले, पुष्पा डायगव्हाणे, साकोली शहर काँग्रेस अध्यक्ष अश्र्विन नशिने मंचावर उपस्थित होते. पाहुण्यांचे प्राचार्य अर्चना बावणे ह्यांनी स्वागत केले.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


साकोलीत चक्रवर्ती राजाभोज जयंती संपन्न क्षत्रीय पोवार समाज संघटनेचे आयोजन


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चा राजीनामा मंजूर.!




या सत्कार समारंभास प्रास्ताविक होमराज पाटील कापगते साकोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा यांनी करीत याप्रसंगी सर्व अतिथींचे या माजी आमदार स्व. मार्तंडराव कापगते यांच्या शिक्षणाय पावन भूमीत आल्याबद्दल हार्दिक मनःपूर्वक स्वागत केले. सुवर्ण महोत्सवी माजी शिक्षक आमदार व्ही.यु. डायगव्हाणे व शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा येथे सपत्निक सत्कार करण्यात आला. भाषणात आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले की ६ जिल्ह्यातील शिक्षकांची जूनी पेंशन योजना जोपर्यत लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेत हा वारंवार लक्षवेधी सूचना मांडल्या जाईल. सरकार समारंभात संचालन रूपेश कापगते तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण लंजे यांनी केले. या समारंभास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातील सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि पाचशेच्या वर सदस्यगण उपस्थित होते. प्रसंगी मार्तंडराव कापगते महाविद्यालय जांभळी येथील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात स्वागत गीत, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्कृष्ट प्रस्तुती दिली हे उल्लेखनीय. मिडीयाला प्रसारण सेवा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज व साकोली मिडीयाचे आशिष चेडगे व एशियन न्यूजचे शुभम खांडेकर यांनी केले.