साकोलीत विदर्भस्तरीय दोन दिवसीय “बि-हाड परिषद” महोत्सवाला सुरुवात

85

साकोलीत विदर्भस्तरीय दोन दिवसीय “बि-हाड परिषद” महोत्सवाला सुरुवात

• भटके विमुक्त समाजातील ९ जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित • छायाचित्रे प्रदर्शनी • बि-हाड झोपड्यांतून भटकंती रहाणीमान ठरले आकर्षक 

साकोली / महाराष्ट्र
दि. ११. फेब्रुवारी २०२३
रिपोर्ट : आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज.

सविस्तर बातमी साकोली : भटके विमुक्त कल्याणकारी परिषद अंतर्गत साकोलीत ( ११ व १२ ) फेब्रुवारी या दोन दिवसीय विदर्भस्तरीय बि-हाड परिषदेचा शुभारंभीय सोहळा शंकरपट मैदान बेलदार समाज प्रभागात आयोजन करण्यात आला. येथे भटकंती समाजातील जीवनावर छायाचित्रे प्रदर्शनी, झोपडीतून रहाणीमान भटकंती कुटुंब हे विशेष आकर्षण होते. येथे एकुण ९ जिल्ह्यातील भटके विमुक्त कल्याणकारी परिषद पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


Transfer : चंद्रपुर जिले में 34 पुलिस अधिकारियों के तबादले..


 

या समारंभात उदघाटक माजी आमदार डॉ. परीणय फुके, अ.भा.घु.प.अध्यक्ष दुर्गादास व्यास, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, प्रा. सुवर्णा रावळ मुंबई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक सोयाम, तहसिलदार रमेश कुंभरे, उध्दव काळे अभियंता नाशिक, भ.वि.क.संस्था अध्यक्ष शेखर बोरसे, उपाध्यक्ष राजेंद्र दोनाडकर, स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट संस्थापक प्रकाश बाळबुध्दे, रामेश्वर भिसे, सचिव दिलीप चित्रीवेकर, श्रीकांत तिजारे, भंडारा जिल्हा शिवा कांबळे, शामराव शिवणकर, छमन कांबळे, उकांडा वडस्कर विदर्भ प्रदेश, डॉ. परीणीता फुके, आशिष बाबर अकोला, प्रकाश शेंडे गोंदिया, शेषराव आंधळे, सुवर्णा रावत, उत्तम मानकर, धनवंता राऊत व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. परीणय फुके यांनी सांगितले की साकोलीत हा विदर्भ स्तरीय महोत्सव होणे अत्यंत अभिमानास्पद बाब असून भटकंती समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष मंच तयार करण्याची संकल्पना आहे व ती लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात भटके विमुक्त समाजासाठी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व प्रगती करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात रसिद निंबाळकर सोलापूर, नागेश मानकर नागपूर, आचल बोकडे पवनी, आरती काड तळेगांव वर्धा, पांडुरंग एकनार जामडोह, ज्ञानेश्वर शिंदे वर्धा, महादेव पोटे वर्धा, आशिष बाबर अकोला यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


बिबट्याच्या दाता सह दोन आरोपीं स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.


या दोन दिवसीय भटके विमुक्त कल्याणकारी परिषद – बि-हाड परिषदेत संचालन महेश गोबाडे करीत असून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी व बेलदार समाज समितीचे अर्जून सोनकुसरे, शिवा बोकडे, बंटी सोनकुसरे, सिमल बोकडे, स्वागत समितीचे प्रदीप गोमासे, डॉ. अजयराव तुमसरे, शरद कापगते, जगनराव उईके, डॉ. राजेश चंदवाणी, रवि परशुरामकर, किशोर पोगडे, प्रा. अमोल हलमारे, अँड. मनिष कापगते, हेमंत भारद्वाज, अण्णा सोनकुसरे आणि भटके विमुक्त कल्याणकारी समिती, बेलदार युवक, महिला समितीचे सदस्य अथक परिश्रम घेत आहेत. येथे अतिदक्षता आरोग्य सेवा उपजिल्हा रुग्णालय साकोली डॉ. दिपक चंदवाणी व परीचारीका चमू कर्तव्यावर हजर आहेत.