मुख्य साकोली शंकरपट मैदानावरच होणार पुरातन शंकरपट 

24

मुख्य साकोली शंकरपट मैदानावरच होणार पुरातन शंकरपट 

साकोली/महाराष्ट्र
दि. 01 फरवरी 2023
रिपोर्ट:- ग्लोबल महाराष्ट्र न्यूजसंवाददाता [] आशिष चेडगे

सविस्तर बातमी  साकोली : जूने व मुख्य शहर साकोली येथील प्राचिन काळापासून भरत येणाऱ्या शंकरपट मैदानावरच यंदा नियोजित (१८ – १९ फेब्रुवारी ) तारखेला शंकरपट होणार. नुकतेच याबाबत सपन कापगते मित्र परिवार जूनी परंपरा कायम ठेवण्यासाठी सरसावले असून यासाठी निवेदन सादर करीत परवानगी देण्यात आली आहे.

 


अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त, घटना स्थल पोकलेन व पाणीची बोट जप्त.!


भ्रष्टाचार के कारण, और भ्रष्टाचार के दुष्परिणाम


शंकरपट बाबद मागील न्यायालयीन आदेश आणि कोविड काळात पट स्थगित करण्यात आला होता. पण आता न्यायालयाने कायदेशीर व नियम पाळून पट भरविण्यासाठी हिरवा कंदील दिला. परंपरागत मुख्य साकोली शंकरपट मैदानावरच यंदा पट भरविण्यासाठी येथील शंकरपट समितीचे जूनी कार्यकारिणीतील वरीष्ठांच्या आदेशानुसार सपन कापगते यांनी श्रीराम भक्त हनुमान मंदिर तलाव प्रभागात नुकतेच बैठक घेत नगरपरीषदेमध्ये पत्र देऊन परवानगीही घेतली आहे. यात अध्यक्ष सपन कापगते, उपाध्यक्ष ओंकार कापगते, सचिव विनोद गहाणे, सहसचिव भारत कापगते, जगदीश कापगते, अॅड. मनिष कापगते, हेमंत भारद्वाज, कोषाध्यक्ष कुंदन वल्के, गेंदलाल गहाणे, विष्णू कापगते, सुरेश गोबाडे, सुनिल झोडे, अंकीत गहाणे, अनिल गहाणे, दिलीप झोडे, लोकचंद पुस्तोडे, प्रकाश संग्रामे, सतिश लांजेवार, संजय लांजेवार, शुभम पुस्तोडे, किशोर बोरकर, आनंद लांजेवार, चंद्रशेखर कापगते, सुरेश लांजेवार व सर्व शंकरपट समितीचे सदस्य हजर होते.