सेंदूरवाफा शासकीय जमीन गट क्रमांक ११७/१/(अ) वरील अतिक्रमण हटवा

35

सेंदूरवाफा शासकीय जमीन गट क्रमांक ११७/१/(अ) वरील अतिक्रमण हटवा

अतिक्रमण धारकांच्या जनतेला धमक्या ; शिवसेनेचे मुख्याधिकारींना निवेदन

साकोली/महाराष्ट्र
दि. 30 जानेवारी 2023
संवाददाता : आशिष चेडगे – ग्लोबल महाराष्ट्र न्यूज. •

सविस्तर बातमी साकोली : नगरपरिषदेच्या हद्दीतील शासकीय गट क्रमांक ११७/१/अ मधील अतिक्रमण काढून ही जागा सामाजिक कार्य व सार्वजनिक उपयोगासाठी खुली करण्यात यावी. या करिता शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख प्रमोद मेश्राम यांचे नेतृत्वात साकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. नगर परिषदेकडून काय करवाई केली जाते. याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.

और खबर पढ़ें 👇👇👇


“खेल पुराना क्रेज नया”


साकोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ आदर्श नगर सेंदुरवाफा गट क्रमांक ११७/१/अ मध्ये पतीराम क्षीरसागर यांचे अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यामुळे २५ नोव्हेंबर २०२२ रोजी तहसीलदार साकोली यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. तहसीलदार साकोली यांनी चौकशी केली असता अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले. पण अतिक्रमित जागा नगर परिषद हद्दीत येत असल्यामुळे पत्र क्रमांक ६७७/२०२२ दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ अन्वये आपणास सदर अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत.

और खबर पढ़ें 👇👇👇


खेल खिलाड़ी का पैसा मदारी का.!!


अतिक्रमण धारक पतीराम क्षीरसागर अतिक्रमण कायम राखण्यासाठी स्थानिक रहिवाशांवर दडपण आणीत असून वॉर्डातील नागरिकाविरोधात प्रशासनाकडे तक्रारी करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात नमूद आहे. अतिक्रमित जागा सार्वजनिक उपयोगाची असून वॉर्डातील नागरिकांच्या मागणी नुसार सार्वजनिक वापरासाठी तहसीलदार साकोली यांचे आदेशानुसार ही अतीक्रमीत जागा मोकळी करावी. या करिता शिवसेनेचे वतीने मुख्याधिकारी चौधरी यांना प्रशासकीय अधिकारी स्वपनिल हमाने मार्फत निवेदन देण्यात आले, यात शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद मेश्राम, उपतालुका प्रमुख विलास मेश्राम, जितेंद्र उईके, तालुका सचिव रितेश उके, युवा सेनेचे आकाश मेश्राम, उपतालुका संघटीका स्नेहा मेश्राम, तालुका संघटिका सुनीता भैसारे, उपजिल्हा संघटीका प्रतिभा पारधी, मनिषा पोगडे, अनिल डोमळे यांचेसह प्रभागातील २८ नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्यांसह सदर शासकीय भूखंडावरील अतिक्रमण काढण्यासाठी निवेदनात नमूद केले आहे.