झाडीबोली भाषेवर गर्व आहे — डॉ. हरिश्चंद्र बोरकर

62
झाडीबोली भाषेवर गर्व आहे — डॉ. हरिश्चंद्र बोरकर
 
दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनाचा समारोप • पिंडकेपार वासीयांचे मानतो प्रथम आभार – अॅड. सिताराम हलमारे यांचे प्रतिपादन 
 
साकोली/महाराष्ट्र
दि. 30 जनवरी 2023
रिपोर्ट:- साकोली संवाददाता
 
सविस्तर बातमी:- साकोली : झाडीबोली संस्कृती महान असून ही आपल्या भाषेवर गर्व आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ३० व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे समारोप प्रसंगी ( २९ जाने.) पिंडकेपार येथे केले. तर या संमेलनाचा पहिला मान पिंडकेपार ग्रामवासीयांना जात असून त्यांच्या उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसादाने हे शक्य होऊ शकले असे मत सर्वांगिण शिक्षण संस्था सचिव अॅड. सिताराम हलमारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्यांसमोर “हम भारत मां के बच्चे है..हम भारत मां के दूलारे है” गीत सादर करताच विद्यार्थ्यांनी देशोभिमान गजरात या देशप्रेम गिताला साथ देत टाळ्यांचा गजर केला.
और खबर पढ़ें 👇👇👇


              झाडीबोली साहित्य मंडळ, शारदा सार्वजनिक वाचनालय व सर्वांगीण शिक्षण संस्थेच्या वतीने साकोली मौजा पिंडकेपार येथे आयोजित ३० व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या विविध भाषणातून झाडीबोली भाषेची संस्कृती जोपासण्याची गरज, या संस्कृतीला मुंबईसह राष्ट्रीय स्तरावर नेऊन झाडीबोली भाषेची जाण करून देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील कवि, साहित्यिक, लेखक, हरी भक्त परायण, पत्रकार व शिक्षकांचा अनमोल वाटा आहे असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. मंचावर डॉ. हरिश्चंद्र बोरकर, कवियीत्री रंजना हलमारे, डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ. परशुराम खुणे, राम महाजन, अॅड. सिताराम हलमारे, कवी हिरामण लंजे, संत डोमाजी कापगते, प्राचार्य अमोल हलमारे, सरपंच नंदू समरीत, डॉ. नेपाल रंगारी, साहित्यिक दिवाकर मोरस्कर, मनिषा काशिवार, देवश्री कापगते, प्रिती कापगते, जि.प.स. दिपलता समरीत, रवी परशुरामकर, अॅड मनिष कापगते, सरिताताई लंजे, सुनीता समरीत आदी मंचावर उपस्थित होते.  हे दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनासाठी डॉ. पाखमोडे डॉ. संजय निंबेकर, प्रा. नरेश आंबिलकर, बंडोपंत बोढेकर, टिकाराम समरीत, झाडीबोली साहित्य मंडळ, शारदा सार्वजनिक वाचनालय व सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंडकेपार संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद व सदस्यगणंनी विशेष परीश्रम घेतले. समारोपीय समारंभात संचालन प्रा. नरेश देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अमोल हलमारे यांनी केले.