अनं लहान विद्यार्थी पोहोचले थेट पोलीस स्टेशनमध्ये.

85

अनं लहान विद्यार्थी पोहोचले थेट पोलीस स्टेशनमध्ये.

सविस्तर माहिती लहान बालकांना सांगण्यात आली.

साकोली/महाराष्ट्र
दि. 27 जानेवारी 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता साकोली

सविस्तर बातमी साकोली : पोलीस ठाणे साकोलीत प्रजासत्ताक दिनाच्या २५ जानेवारी पूर्वसंध्येला येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळा गणेश वार्डातील विद्यार्थ्यांचा जमाव थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. प्रथम तर स्टेनशला कर्तव्यावर हजर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शाळेत काही झालं तर नाही, विद्यार्थी सुरक्षेसाठी काही या विद्यार्थ्यांची मागणीवर धडक तर नाही असा प्रश्न मनात आला. पण खरे कारण कळल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या उपस्थित प्रत्येक प्रश्णांची प्रात्यक्षिके सादर करून उत्तरे देत शंकेचे समाधान केले.

और न्यूज देखें👇👇👇

खेल खिलाड़ी का पैसा मदारी का.!!

सविस्तर माहिती लहान बालकांना सांगण्यात आली.

      “पोलीस काका – पोलीस दिदी” या महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या अभियान अंतर्गत पोलीस आणि विद्यार्थी यातला संवाद, संवेदनशील स्थितीत, दंगाधोपा, दहशतवादी कारवाया, संशयास्पद दिसणारे देशविरोधी शत्रुंच्या हालचाली अशा घटनांची तातडीने माहिती मुलांकडून भारतीय सुरक्षा व्यवस्थेला मिळावी यासाठी दक्ष रहाणे, सचेत सावधान असणे, पोलीस मदत केंद्र, आरोग्य सेवा हेल्पलाइन, महिला सुरक्षा टोल फ्री क्रमांक अशी विविध प्रकारची माहिती आणि दक्षतेबाबद साकोली पोलीस ठाणे येथे जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ शाळा क्र. ०१ च्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच पोलीस ठाणे कार्यालयाचा कार्यभार कसा चालतो, आणिबाणीच्या स्थितीत पोलीसांची शस्त्रांसह तातडीची भुमिका, दंगाधोपा नियंत्रणात पोलीसांची शांतता व सुव्यवस्थेकरीता भुमिका कशी असते याचेही सविस्तर माहिती लहान बालकांना सांगण्यात आली. सदर “पोलीस काका पोलीस दिदी” अभियानात पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, जि.प. शिक्षक आर. आर. बांगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे आशिष चेडगे, शिक्षिका आर एल बिसेन, विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन कोवे, विद्यार्थीनी प्रतिनिधी डिम्पल कापगते, पोलीस ठाणे कर्मचारी पो. नायक अमितेश वडेट्टीवार, स्वप्निल गोस्वामी, गुलाब घासले, स्नेहदिप टेंभुर्णे, सहा.फौजदार कचरू शेंडे, मोहन कन्नाके, अनिल तवाडे, प्रतिक बोरकर, सचिन राऊत, मुकेश पटले, संजय पाटील, राजेश भजने, अश्र्विन भोयर, महिला पोलीस संगिता लुटे आणि पोलीस विभागातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी पाहिजे ती माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर देत विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.