मुल येथील १९ लाखाची जबरी चोरीचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश.

19
मुल येथील १९ लाखाची जबरी चोरीचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश
 
दोन आरोपींना अटक
 
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 21 जानेवरी 2023
रिपोर्ट : जिल्हा संवाददाता
 
 
सविस्तर बातमी:-  दि.16 मार्च 2022 रोजी फिर्यादी नामे दिनेश प्रकाश चलाख वय 33 वर्षे रा.सिंतळा मुल व त्यांचा मित्र अक्षय विलास गोवर्धन वय 27 वर्षे रा. शिवाजी नगर वार्ड क्र.77 मुल जि.चंद्रपूर हे दोघे त्यांचे मालक दिनेश गोयल यांचे महालक्ष्मी ट्रेडींग कंपनी ची विवीध ठिकाणावरून वसुली करून परत येत असतांना अंदाजे 20.45 वा ते 21.00 वा. दरम्यान चंद्रपूर मुल रोडवरील जानाळा ते डोणी फाटयाजवळ मागुण येणाऱ्या मोपेड मोटार सायकल वरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचे गाडीचे हॅन्डल पकडून खाली पाडुन त्यांना मारहाण करून त्याचे जवळील 18,93,520 /-रू.ची नगदी रोकडची बॅग जबरीने हिसकावून घेवून गेले.
अशा फेर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टेमुल अपक्र
154 ,//2022 कलम 394 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये बाळासाहेब खाडे पो.नि.स्था.गु.शा. यांचेकडे
देण्यात आला. दि.20 जानेवारी 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, मुल येथील 1) केतन अशोक बुटले वय 23 वर्षे 2 तोहीद आरीफ शेख वय 24 वर्षे दोन्ही रा. वार्ड नं.17 ताडाळा रोड मुल जि.चंद्रपूर यांनी सदरचा गुन्हा केला आहे त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो. हवा. नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ.सुभाष गोहोकार /814, पो.कॉ.सतिश
बगमारे, यांचे पथक गठीत करून नमुद आरोपीतांवर गोपनिय पाळत ठेवली असता ते मिळून आले.
 त्यांना गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीने चोरीचे रोकडमधुन खरेदी केलेले 
1) 4, लाख रू. एक लाल रंगाची वरणा चारचाकी वाहन जुनि वापरती वाहन क्र.एम.एच.40 एसि 6354
2) 2,25,000,/-रू. एक जुनी वापरती खाकी रंगाची बुलेट मोटार सायकल क्र.एम.एच.34 बिएस 8333 तसेच गुन्हयात वापरलेले वाहन
3) 1 लाख -रू. एक जुनी लाल रंगाची मारोती 800 चारचाकी वाहन क्र. एम.एच. 31 झेड 3789
मालमत्ता आरोपीतांकडून हस्तगत करण्यात आली. आरोपींचा पि.सि.आर.घेवून उर्वरीत मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ.सुभाष गोहोकार /814, पो.कॉ. सतिश बगमारे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास बाळासाहेब खाडे, पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.