अमली पदार्थ बाळगणाऱ्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

81
अमली पदार्थ बाळगणाऱ्यास अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
 
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 13 जनवरी 2023
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता 
 
सविस्तर बातमी चंद्रपुर :- दि. 12/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, घुग्घूस येथील एक इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणलेला असुन तो विक्री करीत आहे.
अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे स. पो. नि. मंगेश भोयर यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करून त्यांना पाचारण करून छापा घालण्याबाबत मार्गदर्शन केले.
स.पो.नि. मंगेश भोयर यांचे पथक, पंचासह घुग्घूस येथे जावून मिळालेल्या खबरे प्रमाणे आरोपी वतन लक्ष्मण तापेल्ली वय 32 वर्षे रा. वार्ड नं.06 घुग्घूस यास ताब्यात घेवून त्याचे कडून 174 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला.
 त्याचे विरूद्ध पो.स्टे. घुग्घुस येथे अप.क्र. 12 / 2023 कलम 8 (क ) 20 (ब) (ii) (ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S. अॅक्ट) 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोहवा. संजय आतकुलवार, प्रमोद डंबारे, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहुले, निराशा तितरे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. हे घुग्घूस हे करीत आहे.