अवैध कोळसा वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांवर पोलीसांची कारवाई.!

77

अवैध कोळसा वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांवर पोलीसांची कारवाई.!

यवतमाल/महाराष्ट्र
दि. 11 जनवरी 2022
रिपोर्ट:- जिल्हा संवाददाता

सविस्तर बातमी:- वणी- मुकुटबन मार्गावर कोळसाने भरलेले काही वाहने अवैधरित्या कोळसा चोरून नेत असल्याची माहिती पो.नी.प्रदिप सिरस्कर यांना कळताच त्यांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ वाहनांची चौकशी करून कोळसा चोरी करणारे वाहने ताब्यात घेतली. ही कारवाई आज दि. ११ जानेवारी ला पहाटे करण्यात आली असून यात २० लाख ८० हजाराजा कोळसा व आठ वाहने अंदाजे किंमत २ कोटी २१ लाख असा एकुण २ कोटी ४१ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी पो.नि प्रदिप शिरस्कर यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुकुटबन ते वणी या रोडवर काही जडवाहतुक करणारे वाहन हे अवैधरित्या कोळशाची वाहतुक करीत आहेत, अशा खबरे वरून पो.नि प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि माधव शिंदे, स.पोनि. अमोल मुडे, पोह / उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, महेश नाईक, सुधिर पिदुरकर, चालक सतिश फुके स्थागुशा व पोस्टे वणी स्टाफ पोना हरींद्रकुमार भारती व वसिम शेख चापोना सुरेश किनाके यांनी मुकुटबन ते वणी रोडवर ग्राम पेटुर ता. वणी येथे सापळा रचुन जडवाहतुक अवैधरित्या कोळशाची वाहतुक करणारे ८ वाहन ताब्यात घेतले. त्यांना नमुद कोळशाच्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैदय कागदपत्रे त्यांनी सादर केले नसल्याने नमुद वाहन हे डिटेन करून फौ.प्र.सं.कलम ४१ (१)(ड) प्रमाणे कार्यवही करण्यात आली नमुद वाहनामध्ये एकुण अंदाजे २० लाख ८० हजार रूपायाचा कोळसा व वाहनाची अंदाजे किंमत २ कोटी २१ लाख असा एकुण २ कोटी ४१ लाख ८० हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढिल तपास स.पो.नि माधव शिंदे पोस्टे वणी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुश जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, ठाणेदार पो. नि. प्रदिप शिरस्कर, पोनि प्रदिप परदेशी स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि माधव शिंदे पोस्टे वणी, स.पोनि. अमोल मुडे पोह / उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, महेश नाईक, सुधिर पिदुरकर, चालक सतिश फुके स्थागुशा व पोस्टे वणी स्टाफ पाना हरींद्रकुमार भारती व वसिम शेख, चापोना सुरेश किनाके यांनी केली आहे.