अवैध तंबाकू विक्रेता वर पुलिसची कार्यवाही, १ लाख ५४ हजार चा माल जप्त..

179

अवैध तंबाकू विक्रेता वर पुलिसची कार्यवाही, १ लाख ५४ हजार चा माल जप्त..

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 29 डिसेंबर 2022
रिपोर्ट:- जिला संवाददाता

सविस्तर बातमी :-

दिनांक २६/१२/२०२२ रोजी फिर्यादी नामे नापोशि/ १२२९ विनोद यादव पोलीस स्टॉफसह पोउपनि विनोद भुरले व पोलीस कर्मचारी असे पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, नामे मुकेशकुमार गुप्ता, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर हा आपले किरायचे राहते घरी होलसेल मध्ये विक्रीकरीता पान मटेरीयल सामान, किराणा सामान साठवुन त्यामध्ये सुगंधित तम्बाकु / पानमसाला / स्वीट सुपारी / हुक्का या अन्नपदार्थाच्या विक्रीकरीता साठा करून अवैधरित्या विक्री करीत आहे अशा खबरे वरून नमुद आरोपीचे राहत असलेल्या किरायचे घरी पंचा समक्ष रेड केली असता त्याचे राहते घराचे पहील्या खोलीत डाव्याबाजुला पांढ-या चुंगडयांमध्ये प्रतिबंधित सुगंधित तम्बाकु मजा / पानमसाला / सुंगधीत सुपारी असा एकुण १,५४,२०४/- रूपयाचा माल मिळाला असुन यातील आरोपी हा अन्नपदार्थाच्या विक्रीकरीता साठा करून मा. अन्न सरुक्षा आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन म.रा. यांचे आदेशाचे उल्लंघन केले तसेच सदर प्रतिबंधक अन्न पदार्थाचे सेवन केल्याने कर्करोग व मुखरोग व प्रजननावर विपरीत परिनाम होतो तसेच अतिसेवनामुळे कर्करोग होवु शकतो याची जानिव असुन सुद्धा सदर अन्नपदार्थाची साठवणुक करून विक्री केली अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अप.क्र. १३०३/२०२२ कलम १८८, २७३३२८ भादंवि सहकलम ३० (२), २६ (२) (iv), ३, ४, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
सदर कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार सा., चंद्रपुर, मा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश मुळे सा. पोस्टे रामनगर यांचे मार्गदर्शनात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार तसेच डी. बी. पथक रामनगर यांनी केली.

पोस्टे रामनगर अप.क्रमांक:- १३०३/२०२२ कलम १८८, २७३३२८ भादंवि सहकलम ३० (२) (a), २६ (२) (iv), ३, ४, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ आरोपी नाव :- मुकेशकुमार प्रयाससाव गुप्ता, वय ५० वर्ष, धंदा-पान मेटेरियल, रा. रयतवारी कॉलरी, कॉम्लेक्स मागे, चंद्रपुर

जप्त माल :-

  1. प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर EAGLE HUKKAH SHISHA TOBACCO असे लिहलेले ४०० ग्रॅम वजनाचे ६२ नग प्रत्येकी किमंत ७००/- रु असा एकुण ४३,००० /- रू
  2. लाल रंगाच्या प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर इंगल असे लिहलेले २०० ग्रॅम वजनाचे ८३ नग प्रत्येकी किं ३४०/- रू प्रमाणे असा एकुण २८,२२०/- रु
  3. प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर होला हुक्का शिशा तम्बाकु असे लिहलेले २० ग्रॅम वजनाचे २१ नग प्रत्येकी किं १६४/- रू प्रमाणे असा एकुण ३,४४४/- रू
  4. निळया रंगाच्या प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर विमल पान मसाला असे लिहलेले २१ नग पॉकेट प्रत्येकी १२०/- रु. प्रमाणे असा एकुण २,५२०/- रू
  5. निळया रंगाच्या प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर व्हि १ तम्बाकु पॉकेट असे लिहलेले ३६ नग पॉकेट प्रत्येकी ३०/- रु. प्रमाणे असा एकुण १,०८०/- रू.
  6. लाल रंगाचे प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर काही लिहुन नसलेले सिल बंद ५ किलो प्रमाणे १० नग प्रत्येकी कि. ५,०००/- रु. प्रमाणे असा एकुण ५०,०००/- रू.
  7. जांबळया रंगाचे प्लॉस्टीक पॉकेट ज्यावर अन्नी गोल्ड स्वीट सुपारी पॉकेट ६४ नग प्रत्येकी किं. ६० /- रू प्रमाणे असा एकुण ३,८४०/- रू
  8. लहान टिनाचा डब्बा ज्यावर मजा १०८ असे लिहलेले ५० ग्रॅम वजनाचे ९० नग डब्बे प्रत्येकी किं. २३५/- रु. प्रमाणे असा एकुण २१,१५०/- रु.
  9. लहान प्लॉस्टीक डब्बे ज्यावर ZATKA POWDER १९ नग डब्बे प्रत्येकी ५०/-रू असा एकुण ९५०/- रु वरील सर्व एकुण १,५४,२०४/- रू. चा मुद्देमाल

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक श्री. राजेश मुळे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो.हवा. रजनीकांत पुट्ठावार, पोहवा / २४५४ प्रशांत शेंदरे, नापोशि/ १२२९ विनोद यादव, नापोशि/ ११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ २१८२ चिकाटे, नापोशि/ मिलींद दोडके, नापोशि/ ११६५ आनंद, नापोशि/९१७ निलेश मुडे, नापोशि/सतिश अवथरे, नापोशी / २४३० लालु यादव, पोशि/ २५१३ विकास जुमनाके, पोशि/ हिरालाल गुप्ता, पोशि/८८१ संदिप कामडी, पोशि/ ६९९ विकास जाधव तसेच मनापोशि/ भावना रामटेके यांनी केलेली आहे.
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, रामनगर