विद्याभारतीचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर उद्बोधन..

9

विद्याभारतीचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर उद्बोधन..

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 29 नवंबर 2022
रिपोर्ट:- जिला संवाददाता

सविस्तर बातमी:-  विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान संलग्नित विद्याभारती विदर्भ तर्फे चंद्रपूर येथील विद्या विहार कॉन्व्हेंट ला शिक्षण संस्था चालक, शिक्षक व मुख्याध्यापकांकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर विद्याभारती विदर्भ चे संघटन मंत्री माननीय श्री शैलेशजी जोशी यांचे उद्बोधन दिनांक 27 नोव्हेंबर 2022 ला संपन्न झाले.
नवीन शैक्षणिक धोरणाबाबत माननीय शैलेशजी जोशी यांनी उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले.
यात शारीरिक शिक्षण, खेळ, हलकेफुलके प्राथमिक शिक्षण, बहुशाकीय अभ्यासक्रम परीक्षा पद्धती, प्रगती पत्रक, शोध आधारित शैक्षणिक प्रदर्शने, शिक्षकांची भूमिका, उच्च शिक्षण, भारतीय संस्कृतीला जोडून शिक्षण पद्धती या मुद्द्याचा समावेश होता.
कार्यक्रमाला शिक्षण संस्थाचालक सौ माधवी रवींद्र भागवत, डॉक्टर प्रवीण पोटदुखे, सौ नंदिनी देवइकर, विशेष गिरी, लोकमान्य टिळक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजिरी डबले, सन्मित्र सैनिक शाळेचे मुख्याध्यापिका अरुंधती कावडकर, प्रियदर्शनी कन्या विद्यालय चे मुख्याध्यापिका वैशाली भलमे तसेच शिक्षकवृंद व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून सरस्वती वंदनाने झाली. कार्यक्रमाचे संचालन विद्याभारतीचे जिल्हा मंत्री सुभाष त्रिपाठी यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्याभारतीचे विभाग प्रमुख विवेक आंबेकर यांनी केले.