प्रा. निलेश बेलखेडे यांचा शिवसेना महिला आघाडीतर्फे सत्कार

73

प्रा. निलेश बेलखेडे यांचा शिवसेना महिला आघाडीतर्फे सत्कार

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि. 12 सप्टेंबर 2022

सविस्तर बातमी:-  चंद्रपूर : नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांचा दणदणीत विजय झाला. याबद्दल शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले होते. या निवडणुकीत पहिल्यांदा युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा सेक्युलर परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार प्रा. निलेश रमेशजी बेलखेडे रिंगणात होते. त्यांचा प्रचंड जनसंपर्क, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक कार्यात योगदान, नेतृत्व कौशल्य या भरोशावर सिनेट निवडणुकीत प्रा. बेलखेडे यांनी पहिल्याच प्रयत्नात दणदणीत विजय मिळवला. याबद्दल नवनियुक्त सिनेट सदस्य युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांचा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वाखाली शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वर्षा कोठेकर, विद्या ठाकरे, किरण जुनघरे, प्रतिभा तेलतुंबडे, भास्कर ठावरी, आकाश पावडे, विजय ठाकरे, शिवसैनिक व महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.