सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी केले चांदा ते बांदा अपडेट युट्युब चॅनल चे लोकार्पण

116

सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी केले चांदा ते बांदा अपडेट युट्युब चॅनल चे लोकार्पण

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि: १६ अगस्त २०२२

जिला प्रतिनिधि संपादक 

सविस्तर बातमी चंद्रपूर: महानगरपालिका लगत पार्किंग ग्राउंड, गांधी चौक येथे स्वातंत्र्या ला 75 वर्ष पूर्ण झाले असल्याने अमृत महोत्सवी वर्षा निमित्त योग नृत्य परिवार तर्फे देशभक्तीपर गीतांवर योग नृत्यचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कर्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते विकास पुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार -मंत्री वन, मत्स्य, संस्कृती यांची उपस्थिती होती. तेव्हा त्यांच्या शुभहस्ते चांदा ते बांदा अपडेट युट्युब चॅनलचे लोकरपर्ण करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमात सोबत भाजपा चे जिल्हाध्यक्ष, महानगर डॉ. मंगेश गुलवाडे, माजी,उपमहापौर राहुलभाऊ पावाडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी, रवी आसवांनी,जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझरे, सुभाष कासनगुट्टूवार,विशाल निंबाळकर,चांदा ते बांदा अपडेट चे क्रिएटर संपादक धनराज कोवे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. चांदा ते बांदा अपडेट या युट्युब चॅनलवर सर्व सामन्याचे प्रश्नन सोडविण्यासाठी व जनतेच्या कल्याणार्थ चॅनल उपयोगी पडेल असे बोलतांना चॅनलचे धनराज कोवे एडिटर शुभम गारुळे,संदेश गुहांडे,राहुल काळे यांना भविष्यासाठी शुभेच्छा ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. तेव्हा योगनृत्य प्रमुख गोपालजी मुंदडा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष रुद्रनाराण तिवारी, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार,रामकुमार आकापल्लीवार,अरविंद मडावी,यशवंत शिडाम,प्रलय सरकार, शशिकांत मस्के,बंडू गौरकार,सौ. नीलिमा आत्राम,करियाजी,गणेश रामगुंडावार यांच्या सह शेकडो नागरिक उपस्थित होते.