प्रदेश सरचिटणीस रिटा ताई गुप्ता व सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या प्रमुख उपस्तिथीत भव्य महिला मेळावा संपन्न व सिलाई मशीन चे वाटप..

100

प्रदेश सरचिटणीस रिटा ताई गुप्ता व सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या प्रमुख उपस्तिथीत भव्य महिला मेळावा संपन्न व सिलाई मशीन चे वाटप
सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नसेल तर राजसाहेबांच्या हातात सत्ता द्या,आम्ही महिलांना सुरक्षा देऊ :हेमंत गडकरी

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. १३ अगस्त २०२२

चंद्रपूर: महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चंद्रपूर तर्फे आयोजित महिला मेळावा पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आदरणीय रिताताई गुप्ता व प्रदेश सरचिटणीस आदरणीय हेमंतभाऊ गडकरी यांच्या उपस्थित पार पडलं.हेमंतभाऊनी महिलांना मार्गदर्शन करतांना सरकारला आव्हान केले की आमच्या महिला बगीनींचे जर रोजगार आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवता येत नसेल तर आमच्या साहेबांच्या हातात सत्ता द्या आम्ही करून दाखवू,सोबतच या कार्यक्रमात आलेल्या महिलांना कोणताही प्रश्न असो ते आमच्या पदाधिकारी बरोबर सोडवून देणार,व येणारी महानगरपालिकेची निवडणुकीत मनसेचे नगरसेवक किंग मेकर ठरणार याच मला पूर्ण विश्वास आहे असे हेमंतभाऊनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले,तसेच पक्षाचे सरचिटणीस व महिला प्रदेश उपाध्यक्षा रिताताई गुप्ता यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आले,ताईंनी कार्यक्रमात आलेल्या महिलांना संबोधीत करतांना बेरोजगार महिलांना सरकार रोजगार देऊ शकत नाही पण सतेत नसताना सुद्धा साहेबांचे सैनिक आपल्या कडून गरीब व बेरोजगार महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा काम करत आहे,याचा मला अभिमान आहे असं रिताताईंनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं आणि येणाऱ्या निवडणुकीत आपले नगरसेवकांची संख्या अजून कशी वाढवता येणार यासाठी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमात मागील चार वर्षांपासून अनाथ व गरीब मुलींचं लग्न लावून देणाऱ्या शाहीन दिदीं व बागला हायस्कूल चे प्रिंसिपल रमेश पायपरे सर या दोन समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमात व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस रिताताई गुप्ता,प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी,चंद्रपूर संपर्क प्रमुख व नगरसेवक सचिन भाऊ भोयर,भंडारा संपर्क प्रमुख व शहर अध्यक्ष मनदीप भाऊ रोडे,वाहतूक जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता,विधी विभाग जिल्हाध्यक्ष मंजू ताई लेडांगे,महिला सेना जिल्हाउपाध्यक्ष माया ताई मेश्राम,शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकुर, संगीता ताई धात्रक,स्वाभी राऊत,मनीषा तोकलवर,कृष्णा सुरमवार,पूनम जिलकलवार,सुषमा राय, नीलिमा दुपारे,माधुरी मेश्राम,मंदा ताई करहले,मीना राय,श्रेयांश ठाकुर,जय ठाकूर,राकेश बहुरीया,राकेश पराडकर,मंगेश चौधरी,शुभम सिंग,सागर गडाई, राहुल मडावी,नितीन बावणे सह सैकडो महिला व पुरुष मनसैनिकांची उपस्तिथी होती.कार्यक्रमाचे संचालन कृष्णा सुरमवार प्रस्तावना प्रतिमा ठाकूर व आभार प्रदर्शन पूनम जिलकलवार यांनी केले.