आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन.

144

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्वसानिमित्ग्घुस येथे भव्य हाआरोग्शिबीराचे आयोजन.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि: 31 जुलाई 2020

सविस्तर बातमी:- आज लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही घुग्गुस येथील प्रयास सभागृहात भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेब यांनी फीत कापून केले.

शिबिराची सुरवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
उद्घाटनीय कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर याठिकाणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आणि वेकोलिचे महाप्रबंधक उदयजी कावळे यांनीही आपल्या
भाषणातून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकेत, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, विकासाच्या बाबतीत सदोदित अग्रणी असणार्‍या आदरणीय सुधीरभाऊंनी गोरगरीब, वंचित, निराधार आणि गरजूंच्या मदतीसाठी नेहमीचं तत्परतेने पुढे येऊन सेवाभाव जोपासला आहे. अर्थात, “आमदार सुधीर मुनगंटीवार या शब्दाचा दुसरा अर्थ जिल्ह्यात सेवा” असाचं उच्चारला जातो. त्यामुळे आदरणीय सुधीरभाऊंनी जोपासलेला हा सेवेचा वसा पुढे नेत गोरगरिबांच्या हाकेला ओ देण्याच्या उद्देशातून मागिल अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात पोंभुर्णा व घुग्गुस येथे आदरणीय सुधीरभाऊंच्या वाढदिवशी अशा भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करीत आहोत. या शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांना आरोग्य विषयक सेवा देता यावी, जटील व महागड्या वैद्यकीय चाचण्यांचा फायदा त्यांना यानिमित्तानं निःशुल्क मिळावा हा जनसेवेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्याने हा सेवा उपक्रम आजच्या दिवशी आयोजित करतो.
आजच्या या शिबीरात चंद्रपूर व नागपूर येथून आरोग्य क्षेत्रातील खाजगी तसेच शासकीय अशा सर्व प्रकारच्या आजारांवरील तज्ञ व नामांकित डॉक्टर्स आणि त्यांच्या चमू याठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी आले आहेत. नेत्रतपासणी, लसीकरण, ईसीजी, त्वचारोग, दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग, अस्तिरोग यांपासून तर मॅमोग्राफी, ईको कार्डीयोग्राफी, न्युरो इ. अशा सर्व प्रकारच्या आजारांवर याठिकाणी आलेल्या नागरिकांना तज्ञ डाॅक्टरांकडून निःशुल्क औषधोपचार व मार्गदर्शन मिळणार आहे.

पुढे बोलताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही या महाआरोग्य शिबीराचा लाभ घुग्घुससह परिसरातील हजारो नागरिकांना देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही जिल्हाध्यक्ष भोंगळे म्हणाले.

या शिबिराला, चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, ए.सी.सी. सिमेंटचे अनिल गुप्ता, लायड मेटलचे प्रशांत पूरी, महामिनरलचे अनुराग गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड साहेब, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, डॉ. रवी आलुरवार, डॉ. मंगेश टिपनिस, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. अजय दुद्दलवार, डॉ. अभ्युदय मेघे, मुकूंद दुबे, अनिल धकाते, सौ. सोनल बुक्कावार, सौ. अमृता ठाकरे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि. प. सभापती सौ. नितूताई चौधरी, माजी उपसभापती निरिक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, विनोद चौधरी, साजन गोहने, बबलू सातपुते, प्रविण सोदारी, सिनू इसारप, विवेक तिवारी, राजेश मोरपाका, रत्नेश सिंह, सुरेन्द्र भोंगळे, महेश लठ्ठा, सुरेन्द्र जोगी, हेमंत पाझारे, श्रीकांत सावे, श्याम आगदारी, सौ. वैशालीताई ढवस, तुलसीदास ढवस, अजय आमटे, सुनिताताई पाटील, सौ. किरणताई बोढे यांचेसह घुग्गुस शहरासह परीसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते.