त्या रस्त्यावरील खड्डे बुजवा, भाजयुमो महासचिव सुनील डोंगरे यांची मागणी महानगर भाजयुमोचे मनपाला निवेदन

73

त्या रस्त्यावरील खड्डे बुजवा, भाजयुमो महासचिव सुनील डोंगरे यांची मागणी

महानगर भाजयुमोचे मनपाला निवेदन

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि: 24 जुलाई 2022

सविस्तर बातमी:- तुकुम येथील एस. टी. वर्क शॉप ते बी.जे.एम. कारमेल अकॅडमी ते अयप्पा मंदीर पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत.हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी भाजयुमो महासचिव सुनील डोंगरे यांनी केली असून यासंदर्भातील निवेदन मनपा आयुक्तांना गुरुवार 21 जुलैला महानगर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे देण्यात आले.यावेळी भाजयुमो युवानेते सुशांत अक्केवार, सुमित भोजेकेर,स्वप्नील फाळके, अभि काळे व अमित तिवस्कर याची उपस्थिती होती.

 

उपरोक्त परिसरात बी.जे.एम. कारमेल अकॅडेमी शाळा असल्यामुळे मोठया प्रमाणात वर्दळ सुरू असते, अनेक पालक आपल्या मुलाला शाळेत ने-आण करण्याकरीता दुचाकीने येत असतात तसेच विद्यार्थीचे ऑटोरिक्षा सुध्दा मोठया प्रमाणात येत असतात. सद्यः पावसाळाचे दिवस सुरू असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्यामध्ये पाणी साचुन राहत असून त्यांचा अंदाज वाहतुकदाराला येत नसून यामुळे अपघात होत आहे. भविष्यात कोणत्याही मोठ्या अपघाताची शक्यता होवू नये याकरीता सदरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे अत्यंत आवश्यक आहे.असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा प्रशासनने त्वरित कारवाई न केल्यास भाजयुमो महानगर तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे.