बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागातील फेरफार प्रक्रिया सुरळीत करा:- राजु झोडे

62

बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागातील फेरफार प्रक्रिया सुरळीत करा:- राजु झोडे

फेरफार बाबतची किचकट प्रक्रिया थांबवून जनतेला नाहक त्रास देणे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन वंचितचा इशारा

चंद्रपुर/महाराष्ट्र दि. 11 जुलाई 2022

सविस्तर बल्लारपूर:- बल्लारपूर नगरपालिकेच्या कर विभागाने सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्यासाठी फेरफार करताना न्यायालयीन वारसान प्रमाणपत्र आणण्याचे सांगितले जात आहे. पूर्वी शपथपत्रावर फेरफार केल्या जात होते. परंतु आता नगरपालिकेने जाचक अट दिल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. न्यायालयीन वारसान प्रमाणपत्र आणण्याकरता वेळ व अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. वारसान प्रमाणपत्र बाबत असा कोणताही शासकीय आदेश नसताना बल्लारपूर नगरपालिका जबरदस्तीने ही प्रक्रिया राबवत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना फेरफार करण्यासाठी नगरपालिकेच्या चकरा मारावे लागत आहे. ही प्रक्रिया कायद्याच्या बाहेर असून ती तात्काळ बंद करावी व पूर्वीप्रमाणेच शपथपत्रावर फेरफार करून द्यावे या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी द्वारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

वरील मागणी तात्काळ पूर्ण करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला. निवेदन देताना राजू झोडे, संपत कोरडे, अनिरूप पाटील, भूषण पेटकर, स्नेहल साखरे, जाकिर खान,नविन डेविड तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.