मंडल रेल उपभोगकर्ता सलाहकर समिती सदस्यपदी राज यादव

96

मंडल रेल उपभोगकर्ता सलाहकर समिती सदस्यपदी राज यादव

चंद्रपुर/महाराष्ट्र:  दि: 09 जुलाई 2022

 

सविस्तर बातमी चंद्रपूर : नागपुर रेल्वे मंडळाअंतर्गत चंद्रपूर रेल्वे सलाहकार समिती वर खासदार बाळू धानोरकर यांच्या शिफारशीवर शहर काँग्रेस जिल्हा महासचिव राज यादव यांची ३० जून २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली. उपमहाप्रबंधक, बिलासपूर यांचे पत्र क्र. DGM / द पु म रे / म रे उ स स / ०२३ / २०२२-२३/१९७१/व वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक द पु म रेल्वे, नागपूर यांचे कार्यालय पत्र क्र. सजी / २७ / DRUCC/ 2022-23 दि. ६.७.२०२२ अन्वये ३१. १२. २३ पर्यंत साठी हि नियुक्ती करण्यात आली आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात ते सक्रिय असून उत्तर सेल ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी ते कार्यरत आहे. तसेच यवतमाळ ग्रामीण आणि शहर येथे काँग्रेस निरीक्षक पदी देखील पक्षाच्या संघटन वाढीकरिता ते काम करीत आहे. जिल्ह्यातील रेल्वे विभागातील समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

 

या नियुक्तीला न्याय देत रेल्वे विभागात निर्माण होणारे प्रश्न खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात निकाली काढण्याचे आश्वासन नवनियुक्त सदस्य राज यादव यांनी दिले आहे. या नियुक्तीबद्दल मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.