नोपानी साहेब, माढेळी येथील सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांचा बंदोबस्त होईल का?  

88

नोपानी साहेब, माढेळी येथील सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांचा बंदोबस्त होईल का?  

खुलेआम सट्टापट्टी चालविणाऱ्या कुळसंगेवर पोलीस मेहरबान कसे ? असा संतप्त प्रश्न राहिला आहे उभा. 

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि.13 मई 2022
वरोरा प्रतिनिधी :-

सविस्तर:- 👉वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार खोब्रागडे हे सेवानिवृत्ती च्या मार्गावर असल्याने त्यांनी त्या परिसरातील अवैध धंदेवाईक यांना खुली सूट दिल्याचे सर्वत्र बोलल्या जाते, अशातच त्यांनी माढेळी येथील सट्टाकिंग ज्याच्याजवळ कोट्यावधी रुपयांची नगद व इतर वस्तूंच्या रूपात सापडू शकते त्या सुरेंद्र बळीराम कुलसंगे ह्या सट्टापट्टी चालविणाऱ्या इसमाला विशेष सवलत देऊन माढेळी या गावात युवकांना  सट्टापट्टी च्या जुगारात ढकलले आहे, या धंद्यातून तो दररोज लाखों रुपयांची सट्टापट्टी घेत असून सुरेंद्र बळीराम कुलसंगे ह्यांनी सट्टापट्टी च्या धंद्यातून कोट्यावधी रुपयांची माया जमवली असल्याची चर्चा आहे, विशेष म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर माढेळी पोलीस चौकी असली तरी त्यांच्या समोर हा सट्टापट्टी चा व्यवसाय जोमात सुरू आहे, या संदर्भात वर्तमानपत्रात बातमी आली तर तो पत्रकारांना पण आव्हान करतो की पोलिसचं माझ्या खिशात आहे तर तुम्ही माझ्याविरोधात  लिहून काय कराल ? म्हणजे पोलिसांची पूर्ण सहमती त्याला असल्याने तो निर्ढावलेला आहे आणि म्हणून नोपानी साहेब याचा बंदोबस्त होईल कां असा संतप्त प्रश्न जनता विचारत आहे.

https://www.globalmaharashtranews.com/2022/05/11/breaking-news/4729/

सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी  हे सुट्टीवर व ट्रेनिंग वर असल्या कारणाने ठाणेदार खोब्रागडे यांच्या सहमतीने सुरेंद्र बळीराम कुलसंगे ह्यांची सट्टापट्टी अगदी जोमात होती व आता सुद्धा सुरू पण या बाबतीत आता सहाय्यक पोलीस अधीक्षक नोपानी यांनी हात घातला तर सुरेंद्र बळीराम कुलसंगे यांचा बैंड बाजू शकतो, कारण ज्या पद्धतीने निडरपणे राजकीय दबाव असताना वाळू माफियांवर नुकतिच कारवाई केली त्या पार्श्वभूमीवर आता अवैध सट्टापट्टी चालविणाऱ्यावर पण कारवाई होणे अपेक्षित आहे. आता या सुरेंद्र बळीराम कुलसंगे यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.