कलकाम कंपनीच्या संचालक व इतरांवर एम.पी. आय. डी. अंतर्गत त्वरीत गुन्हे दाखल करा,

34

कलकाम कंपनीच्या संचालक व इतरांवर एम.पी. आय. डी. अंतर्गत त्वरीत गुन्हे दाखल करा,

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली  जिल्ह्यातील एजंट व गुंतवणूकदार करणार ठिय्या आंदोलन.

चंद्रपूर/महाराष्ट्र
दि.13 मई 2022

सविस्तर:- चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कलकाम रिअल इन्फ्रा (इं) लि. या कंपनीच्या संचालकांवर व त्यांना साथ देणाऱ्या गुंडावर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये त्यांना मिळवून द्यावे अशी मागणी कलकाम कंपनीच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना  दिलेल्या तक्रारीतून कलकाम कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांनी केली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात सपना टाकीज समोर असलेल्या विदर्भाच्या कंपनी कार्यालयाला कुलूप लागले आहे त्यामुळे आपले पैसे परत मिळणार नाही त्यासाठी  जिल्ह्यातील गडचांदूर, कोरपना,राजुरा ,बल्लारपूर, मूल, ब्रम्हपुरी, भद्रावती, चंद्रपूर, घुग्गुस  येथील कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांनी आपआपल्या सोयीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी करून कंपनीचे विष्णू पांडूरंग दळवी, सि.एम.डी. कलकाम रिअल इन्फा (इं) लि. मुंबई, विजय सुपेकर (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई.
सुनिल वांद्रे (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. मुंबई) अनिल पासवान विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. ५) महमद इदरीस विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. मुंबई) विजय वासुदेव येरगुडे विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर विदेश प्रभाकर रामटेके विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर किसन मोतीराम पेंदोर रा. राजूरा व या सर्वाना साथ देणाऱ्या गुंड प्रव्रुत्तिच्या भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांच्यावर एमपीआयडी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एजंट व गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की सन २०१३ पासुन कलकाम रिअल इस्टेट कंपनी मध्ये गुंतवणूकदारांनी रु.१ लाखापासून तर रु.१०-१० लाखापर्यंत गुंतवणूक केली आहे परंतु ठरलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांना मुद्दलसह व्याजाची रक्कम देण्यास मागील सन २०१९ पासून कंपनी कडून टाळाटाळ केली आहे.  कंपनीचे स्थानिक पदाधिकारी विदेश रामटेके व विजय येरगुडे यांनी गुंतवणूकदारांना तारखेवर तारखा देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला व त्यांनी आपले स्वतःचे रक्षण करण्यासाठी गुंड प्रव्रुत्तिच्या भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांना सोबत ठेवल्याने गुंतवणूकदारांचे आर्थिक शोषण होत आहे, त्यामुळे आता कलकाम कंपनीच्या सर्व संचालक, व्यवस्थापक व त्यांना साथ देणाऱ्या गुंड प्रव्रुत्तिच्या लोकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत त्वरीत  गुन्हा दाखल अन्यथा येणाऱ्या 20 ते 25 मे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भातील चार जिल्ह्यातील एजंट व गुंतवणूकदार यांचा ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांनी पत्रकारपरिषद घेऊन पोलीस प्रशासनाला दिला आहे. याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती घुग्गुस व ब्रम्हपुरी यांसह गडचिरोली येथील कंपनीचे पिडीत एजंट व गुंतवणूकदार उपस्थित होते.