मनसेच्या वरोरा तालुक्यातील सालोरी गाव शाखा फलकांचे थाटात उद्घाटन.

66

मनसेच्या वरोरा तालुक्यातील सालोरी गाव शाखा फलकांचे थाटात उद्घाटन.

गावात ढोल ताशासह मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या आगमनाप्रित्यर्थ मिरवणूक. शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 21 अप्रैल 2022
वरोरा प्रतिनिधी :-

सविस्तर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरोरा तालुका व शहर शाखा बांधणी ला वेग आला असून मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या नेत्रुत्वात गाव तिथे व वार्ड तिथे शाखा हा संकल्प घेऊन शाखा उद्घाटन सुरू आहे. वरोरा शहारात एकाच दिवशी तब्बल १० वार्डात शाखा उद्घाटन घेऊन एक नवा राजकीय विक्रम मनसेने शहारात केला व तो सपाटा सतत सुरू आहे. अशाच तालुक्यातील सालोरी या गावात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शाखा फलकांचे उद्घाटन मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दिनांक १९ एप्रिलला करण्यात आले.

वरोरा तालुक्यातील चरुरखटी-सालोरी जिल्हापरिषद सर्कल मधील सर्वात मोठे गाव असलेल्या सालोरी गावात काल ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून शाखा फलकांचे उद्घाटन मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर गावाच्या मुख्य चौकात सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनसे नेते रमेश राजूरकर यांनी तरुण बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की जर तुम्हाला तुम्हची पिढी घडवायची असेल व स्वतःच्या पायावर आर्थिक द्रुष्टीने मजबूत व्हायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या कार्यात सहभागी व्हा. ज्या लोकप्रतिनिधीने तुम्हांस दिशाहीन केले आणि तुम्हची डोकी भडकवली त्यांना दूर करा मी तुम्हचे गुरुत्व घेण्यास तयार आहे असे संबोधून तरुण बेरोजगार युवकांना मी हक्काचा रोजगार मिळवून देईल अशी ग्वाही दिली.

या शाखा उद्घाटन सोहळ्यात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,वरोरा शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मनसेचे कट्टर महाराष्ट्र सैनिक कुलदिप श्रिरामे आनंदवन शाखा अध्यक्ष श्रेयस कुमरे विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर यांनी उपस्थिती दाखवली,या  कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सालोरी गावातील शाखा पदाधिकारी शाखा अध्यक्ष शुभम वाकडे, उपाध्यक्ष एकनाथ पडाल, सचिव संदीप मोरे,संघटक रंगनाथ पवार, सहसंघटक  रामेश्वर वाघ,गट अध्यक्ष प्रशांत ढोक, बूथ अध्यक्ष राजू रंदई,कोषाध्यक्ष विशाल रंदई,प्रसिद्धी प्रमुख रोहन धोके , सदस्य -निखिल मोरे, संकेत डोंगरे, गोलु रंदई,संजय काळमेघे, आशिष मोरे,रितेश कांबळे,पंकज वाळके, संदीप रंदई  इत्यादींनी प्रयत्न केले.