आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपाचे जन आक्रोश आंदोलन

78

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपाचे जन आक्रोश आंदोलन

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व खा.अशोक नेते यांची उपस्थिती

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि.19 अप्रेल 2022

सविस्तर बातमी:- गरिबो कि सन्मान मे भाजपा मैदान में…. हा नारा बुलंद करीत येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर व भाजपा महानगर तर्फे गुरुवार (21 एप्रिलला दु 12 वाजता,गांधी चौक चंद्रपूर येथे विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,खासदार अशोक नेते, चिमूर विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडीया, चंदन सिंग चंदेल भाजपा जेष्ठनेते , भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे, माजी आमदार अतुल देशकर , माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार जैनुदिन जव्हेरी, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर हरीश शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महापौर राखीताई कंचर्लावार ,प्रमोद कडू ,संगठन महामंत्री राजेंद्र गांधी,महासचिव सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,संजय गजपुरे,नामदेव डाहूले,राजेश मुन,कृष्णा सहारे,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी,अंजली ताई घोटेकर अध्यक्षा भाजपा महिला मोर्चा महानगर, अल्काताई आत्राम अध्यक्षा भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर, आशिष देवतळे भाजयुमो जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, विशाल निंबाळकर अध्यक्ष भाजयुमो महानगर चंद्रपूर, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार,विठ्ठलराव डुकरे,दिनकर ,संदीप आगलावे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
जनतेशी बेईमानी करून सत्तेत आलेल्या शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या तिघाडी सरकारला जनतेच्या सुखदुःखाशी कोणतेही देणे-घेणे नाही. हे सरकार भ्रष्ट आहे, वसुलीबाज आहे. भष्ट्राचाराच्या आरोपाखाली सरकारच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहे,हे विसरून चालणार नाही. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीने हे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात जनतेनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

 

 • 1) नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रूपये तात्काळ द्या.
 • 2) जगातील सर्वात उष्ण चंद्रपूर जिल्हयात विजेचे लोडशेडींग रद्द करा.
 • 3) शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापू नये.
 • 4)MSEB नी अतिरिक्त सुरक्षा ठेव ची डिमांड त्वरीत रद्द करावी.
 • 5)वैधानिक विकास मंडळ त्वरीत निर्माण करावे.
 • 6( नौकर भरती वैधानिक मंडळाच्या नियमानुसार करावी.
 • 7) धानाचा बोनस त्वरीत द्यावा.
 • 8)रोजगार हमी योजनेची मजुरी त्वरीत द्यावी.
 • 9)घरकुलाचा हप्ता त्वरीत द्यावा.
 • 10) धडक सिंचन विहिरीचे अनुदान त्वरीत द्यावे.
 • 11)2018 पासुन असलेल्या नविन रेशन कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करावे.
 • 12) केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलचे कर त्वरीत कमी करावे.
 • 13) अंत्योदय व बीपीएल कार्ड धारकांना त्वरीत धान्य उपलब्ध करावे.
 • 14) शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना त्वरीत विजेचे कनेक्शन द्यावे.
 • 15)गेल्या २ वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्यात अनेक लोकांचा बळी गेला. वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ मदत करावी तसेच मानव व वन्य प्राणी संघर्ष रोखण्यासाठीतात्काळ उपाययोजना करावी.
 • 16) आदिवासी व गैरआदिवासी बांधवांना वन जमिनीवरील अतिक्रमणाचे स्थायी पट्टे त्वरीत द्यावे.
 • 17)महानगरातील सर्व नझुल निवासी घर धारकांना स्थायी मालकी हक्क पट्टे मिळण्याबाबत.