माढेळी सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांच्या  सट्टापट्टीला ठाणेदार खोब्रागडे यांची मंजुरी ? सट्टापट्टी च्या भरोशावर कोट्यावधी ची बेहिशोबी मालमत्ता,पोलिसांची हप्ता वसुली.

86

माढेळी सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांच्या  सट्टापट्टीला ठाणेदार खोब्रागडे यांची मंजुरी ?

सट्टापट्टी च्या भरोशावर कोट्यावधी ची बेहिशोबी मालमत्ता,पोलिसांची हप्ता वसुली.

चंद्रपुर/महाराष्ट्र
वरोरा प्रतिनिधी :-
दि. 17 अप्रेल 2022

सविस्तर:- वरोरा तालुक्यात ठाणेदार खोब्रागडे यांनी सट्टापट्टी चालविणाऱ्याना हप्ता ठरवून मंजुरी दिली आहेत तर दुसरीकडे तालुक्यातील माढेळी गावात सुरेंद्र बळीराम कुलसंगे ह्या सट्टापट्टी चालविणाऱ्या इसमाला विशेष सवलत देऊन माढेळी या गावात युवकांना  सट्टापट्टी च्या जुगारात ढकलले जात आहे, या धंद्यातून दररोज लाखों रुपयांची सट्टापट्टी घेतली जात असून
सुरेंद्र बळीराम कुलसंगे ह्यांनी सट्टापट्टी च्या धंद्यातून कोट्यावधी रुपयांची माया जमवली असल्याची चर्चा आहे, हाकेच्या अंतरावर माढेळी गावात पोलीस चौकी असली तरी पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी ठाणेदार खोब्रागडे यांच्या सट्टा पट्टी मंजुरी ला विरोध करूं शकत नाही हे विशेष.

सुरेंद्र कुळसंगे नावाचा सट्टापट्टी चालविणारा इसमाची स्थावर मालमत्ता जरी दिसत नसली तरी त्याच्या घराची झाडाझडती घेतली तर कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता पोलिसांना भेटू शकते पण जिथे कुंपणाच शेत खात असेल तर त्या शेताच रक्षण होणार कसे ?अर्थात पोलिसांची सट्टापट्टी घेणाऱ्या सुरेंद्र कुळसंगे सोबत अर्थपूर्ण मैत्री आहेत तर मग पोलीस याला पकडणार कसे ?हा गंभीर प्रश्न आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी मोपानी रुजू झाल्यावर ठाणेदार खोब्रागडे यांची उचलबांगडी होणार ?

वरोरा भद्रावती क्षेत्रात अवैध धंदेवाईक यांचा कर्दनकाळ ठरलेले उपविभागीय पोलीस अधिकारी मोपानी यांचा ट्रेनिंग पिरियड संपत आला असून काही दिवसांतच ते परत रुजू होणार असल्याने ठाणेदार खोब्रागडे यांनी सट्टापट्टी यांसह विविध अवैध धंदेवाईक यांना खुली सूट दिली असल्याने अवैध धंदेवाईक यांची दादागिरी वाढली आहे.  या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी हे ठाणेदार खोब्रागडे यांच्या भ्रष्ट नीतीचा समाचार घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा जनतेला आहे त्यामुळे उपविभागीय अधिकारी कधी रुजू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.