ठाणेदार खोब्रागडे यांच्या आशीर्वादाने माढेळी सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांची सट्टापट्टी पुन्हा जोरात पोलीस माझं काहीच वाकडं करूं शकत नाही सट्टा चालविणाऱ्या  कुळसंगे यांचे पोलिसांना आव्हान ?

73

ठाणेदार खोब्रागडे यांच्या आशीर्वादाने माढेळी सट्टाकिंग सुरेंद्र कुळसंगे यांची सट्टापट्टी पुन्हा जोरात

पोलीस माझं काहीच वाकडं करूं शकत नाही सट्टा चालविणाऱ्या  कुळसंगे यांचे पोलिसांना आव्हान ?

वरोरा प्रतिनिधी :-

सविस्तर वरोरा तालुक्यातील गजबजलेल गाव  माढेळी हे आता नव्या धंद्याने ओळखलं जातंय की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून ठाणेदार खोब्रागडे यांच्या सहकार्याने   सुरेंद्र बळीराम कुलसंगे हे माढेळी या गावात दररोज लाखों रुपयांची सट्टापट्टी घेत असून माझं पोलीस काहीच वाकडं करूं शकत नाही कारण मी सर्वाना पैसे देऊन विकत घेतलं आहे असे आव्हान सुरेंद्र कुळसंगे नावाचा सट्टा पट्टी चालविणारा पोलिसांना करीत असल्याने पोलिसांच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वरोरा पोलीस स्टेशन मधे जेव्हापासून ठाणेदार खोब्रागडे रुजू झाले तेव्हापासून या परिसरात अवैध धंद्याना उधाण आले आहे, त्यातच अवैध धंदे करणारे आता पोलिसांना पण आव्हान करूं लागल्याने पोलीस ह्या अवैध धंदेवाईक यांचे गुलाम झाले का ?हा प्रश्न उपस्थित होत आहे, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल मधे मागील काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित झाल्यानंतर एक दिवस सट्टा पट्टी बंद करणारे कुळसंगे आता चक्क पोलिसांना आव्हान देऊन व बातमी प्रकाशित करणाऱ्या संपादकाला जीवे मारण्याची धमकी देत असेल तर मग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या पोलिसांना शासन पगार देते त्या पोलिसांची सर्वसामान्य जनतेत इज्जत ती काय राहणार ? असा प्रश्न पडतो.  त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन ठाणेदार खोब्रागडे यांच्या व्यवहाराची चौकशी करावी व पोलिसांची इज्जत घालविऱ्या त्या सट्टापट्टी वाल्या कुळसंगेयांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माढेळी परिसरातील जनता करीत आहे.