उत्तमनगर मध्ये पहिल्यांदाच भव्य शिव जयंती

91

उत्तमनगर मध्ये पहिल्यांदाच भव्य शिव जयंती

चंद्रपूर/महाराष्ट्र
दि.21 फरवरी 2022

सविस्तर:- शास्त्री नगर प्रभाग क्रमांक 2 भागातील उत्तमनगर येथे शनिवारी पहिल्यांदाच भव्य शिव जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने वार्डातील ज्येष्ठ नागरिक, घंटा गाडी चालविणाऱ्या महिला, आशा वर्कर, कोविड योद्धा नर्सेस अश्या उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांचा सत्कार या उत्सवाचे विशेष ठरला.

भारतीय जनता पार्टी महानगर सचिव पक्षाचे युवा नेते आणि वार्डातील समाजसेवक चंदन पॉल यांच्या दूरदृष्टीने या शानदार कार्यक्रमाचे आयोजन येथील दुर्गा पूजा मैदानात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर राखी कनचर्लावार, महानगर भाजप जिलहाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ग्रामीण चे देवराव भोंगळे, प्रकाश धारणे, तुषार सोम, डॉ. भट्टाचार्य, श्री. मंडल अध्यक्ष .विट्ठल डुकरे, भाजपा महामंत्री .रवी गुरणुले नगर सेविका शिताल गुरणुले यांची उपस्थिती होती. फटाक्यांची आतिषबाजी आणि डिजे च्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले. उत्तम नगर येथे पहिल्यांदाच शिव जयंती उत्सव साजरा करण्यासाठी भरतीत जनता पार्टी महानगर सचिव चंदन पॉल, प्रशांत बोबडे, अमित पॉल, मंगेश को शुरूकर अनूप देवनाथ नीलेश वाणी राज सोनू ले यांनी अथक परिश्रम घेतले.