प्रभु विश्वकर्मा जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे,

77

प्रभु विश्वकर्मा जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, मयात्मज सुतार (झाडे ) समाज च्या वतीने अनेक सामाजिक कल्पकता,

मयात्मज सुतार (झाडे) समाज चंद्रपुर तर्पे विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने श्री. प्रभु विश्वकर्मा जयंती युवा मंच जागृती मंचच्या संयुक्त विद्यमाने होनार साजरी.

चंद्रपूर/महाराष्ट्र
दि.13 फरवरी 2022
   
सविस्तर बातमी:- मथात्मज सुतार (झाडे ) समाज तर्फे स्थानिक श्री. प्रभु विश्वकर्मा मंदीर एकोरी वार्ड येथे दिनांक १४.२.२०२२ रोजी प्रभु विश्वकर्मा जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, दी. १४.२.२०२२ सोमवार श्री प्रभु विश्वकर्मा जयंती निमीत्त मयात्मज सुतार (झाडे ) समाज च्या वतीने अनेक सामाजिक कल्पकता, चित्रकला,रक्तदान, भजन सारख्या अनेक उपक्रमाची सांगड घालून एक भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम स्पर्धा , दिनांक १३.२.२०२२ रोजी रविवार ला सकाळी १०.३० वाजता घेण्यात येईल यात चित्रकला व रांगोळी ही (ठिपक्याची असेल) हि रांगोळी स्पर्धा १८ वर्षावरील मुली व महिला यांना स्पर्धेत भाग घेता येईल. तसेच चित्रकला ०८ते १८ मुला मुलींकरीता असेल हे सर्व कार्यक्रम सुतार समाज भवन बालाजी वार्ड येथे घेण्यात येईल चित्रकलेचे साहित्य स्वतः स्पर्धकाला आणावे लागेल. सदर कार्यक्रमाला आयोजक फक्त ड्रॉईंग शीट पुरवतील ह्या सर्व स्पर्धे करीता प्रथम, द्वितीय, तृतिय स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षिस तसेच प्रमाणपत्र अश्या स्वरूपान देण्यात येईल. ही स्पर्धा मयात्मज सुतार(झाडे) समाज युवा मंच जागृती महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.. त्याकरीता सदर कार्यक्रमाला बक्षिसाचे प्रायोजन स्व. रमेशराव पांडुरंगजी बुरडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरंजीव श्री.नरेश रमेश बुडकर व देवा रमेश बुरडकर यांच्या कडून देण्यात येत आहे.. तसेच दि १४.२.२०२२ ला सकाळी १०:३० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर एकेरी वार्ड येथील मंदिरात पार पडतील असे युवा मंच चे सक्रिय सदस्य देवा बुरडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्राद्वारे कळविण्यात आले