उकणी खाणीच्या कोळसा चोरीच्या दोन ट्रक हासह आरोपी अटक, वणी पोलिस स्टेशन ची कारवाई,

109

उकणी खाणीच्या कोळसा चोरीच्या दोन ट्रक हासह आरोपी अटक, वणी पोलिस स्टेशन ची कारवाई,

यवतमाल/महाराष्ट्र
दि.11 फरवरी 2022
घुग्घुस प्रतिनिधि: हनिफ शेख

सविस्तर बातमी:- उखनी पेट्रोलींग वणी नार्थ एरीया येथुन प्रभरी AHG अक्षय पाटील असे नमुद करतात की , दि.09-02-2022 रोजी रात्रौ 4:30 वाजता  उखनि खदान परीक्षेत्रात 14-15 चोर आल्याचा,व दोन हायवा ट्रक चोरीचा कोळसा जात असल्याचा  फोन आला . लगेच मी व माझी पेट्रोलींग टीम घेवून फोन आलेल्या दिशेने पोहचलो . आम्हाला बघून हायवा ट्रक mandhe असलेला कोळसा रस्त्याच्या कडेला खाली जागेत कोळसा खाली करताना दिसला..आम्ही पेट्रोलिंग गाडी हायवा ट्रक MH 49 AT9192  समोर लावली असता, आमच्या पेट्रोलिंग गाडीला धडक देण्याचा व आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला..पण ड्रायव्हर च्या हुशारिमुळे आम्हाला आमचा जीव वाचवता आला.आमच्या पेट्रोलिंग गाडीला  धडक देवून एक हायवा,जुनाड खदान कडे व दुसरा हायवा अहेरी गावाकडे पळन्याचा प्रयत्न करत असताना आमच्या टिम ने शिताफीने पाटलाग केला .आमच्या पाठलाग बघुन दोन्ही हायवा ड्रायव्हर चालु गाडीतुन उडी मारुन जंगलात पळुन जात होते .आम्ही पण त्यांचा धावत पाठलाग केला व दोन्ही ड्रायव्हर व एक चोर आमच्या हातात लागला . त्यांना जुनाड चेकपोष्ट येथे आनल्या नंतर सदर घटने संदर्भातील घटनेची माहिती आस्थापना सुरक्षा अधिकारी यांना देऊन त्यांना घटना स्थळी बोलवन्यात आले, त्यांच्या माध्यमातुन क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी,तसेच AGM वणी नॉर्थ एरिया यांना देण्यात आली त्यांच्या सूचनेवरून वणी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक व टिम तसेच शिरपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक  व टिम यांना घटना स्थळी बोलवून त्यांची मदत घेण्यात आली, त्यांच्या सांगण्यावरून खाली पाडलेला  कोळसा पकडलेल्या हायवा यात पुन्हा भरन्यात आला. दोन्ही गाड्यांचा काटा करन्यात आला. दोन्ही गाड्या मध्ये साधारण २५ -२५ टन कोळसा भरुन आला . व त्या हायवा वणी पोलीस स्टेशन येथे जमा करन्यात आल्या ,सदर घटनेत आत्ता पर्यंत 13 अट्टल आरोपींना पोलिसांनी पकडले व त्यांच्या वर पोलिसानं कडून भा. द.वी.395,307,353 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला..

आजच्या घटनेत आमच्या पेट्रोलिंग टीम च्या धडकदार कृती मुळे पकडलेल्या हायवा ट्रक व जवळपास ५० टन कोळसा,दोन्ही मिळुन अंदाजे ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल पकडन्यात यश आल . सदर घटने बद्दल sso वडगावे सर यांना फोन वरून  माहीती देण्यात आली, सदर घटनेची वणी पोलीस स्टेशन निरीक्षक यांच्या कडुन कौतुक करन्यात आले. त्यांनी स्वतः या घटनेची माहीती श्री .देवराज सर पोलीस अधिक्षक म .सु.ब यांना दिली.आजच्या कार्यवाहीत,
AHG अक्षय पाटील
AHG मनोज चव्हाण
ASG क्रांतिवीर दिघोरे
ASG विक्की धाबे
ASG विशाल खंडारे
ASG गजानन चव्हाण
ASG राजेश सोलांखे
ASG अतुल वानखेडे
या सर्व जवानांचे  खुप मोलाचे,हीमतिचे सहकार्य मिळाले.
वरीष्ठां करीता माहीती साठी सादर!