उर्जानगर वसाहतीमध्ये सिएसटिपीएस तसेच प्लॉन्टमध्ये व जंगली प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करा.

84

उर्जानगर वसाहतीमध्ये सिएसटिपीएस तसेच प्लॉन्टमध्ये व जंगली प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करा.

युवासेना तथा कंत्राटी कामगार सेनेची मागणी

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.11 फरवरी 2022

सविस्तर बातमी चंद्रपूर: मागील अनेक वर्षापासून उर्जानगर वसाहत व सि.एस.टि.पी.एस. प्लॉन्टमध्ये जंगली प्राण्यांचे वावर होत आहे. तसेच त्यांचेकडून जीवीत हाणी सुध्दा झालेली आहे. मागील काही दिवसापुर्वी लावण्या दांडेकर नामक चिमूकलीला बिबटच्या हल्ल्यात जीव गमवाव लागला त्यावेळेसही  पुर्वसुचना म्हणुन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा असे पत्र दिले होते. परंतु अजुनही त्यावर पर्याय काढण्यात आला नाही.त्या अनुषंगाने उर्जानगर वहसातीमध्ये तसेच प्लॉन्टमध्ये व जंगली प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी उपजिल्हाप्रमुख युवासेना  कैलाश तेलतुंबडे , चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष कंत्राटी कामगार सेना व युवासेना विधानसभा समन्वयक चंद्रपूर. जिल्हा महासचिव कंत्राटी कामगार सेना, अमोल मेश्राम यांनी  मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर एन.आर.प्रवीण यांना निवेदनातून केली आहे.

दि. ०२ फेब्रुवारीला २०२१ ला सायंकाळी ७-८ च्या सुमारास मा. लांडे यांचेवर वाघाचा प्राणघातक हल्ला झाला. तसेच दि.०७ जानेवारी २०२२ रोजी कंत्राटी कामगार हे डयुटीवर जात असता वाघाने त्यांचा रस्ता मधातच अडकावला त्यामध्ये ते गाडीवरून पडले व सुदैवाने ते बचावले परंतु यानंतरही अशाच प्रकारची मोठी घटना भविष्यात  पुन्हा होऊ नये याकरीता याच्यावर त्वरीत तोडगा काढावा. प्लॉन्टमध्ये मोठया संख्येने कर्मचारी व कंत्राटी कामगार दिवसा रात्री ये-जा करीत असतात.यावर वनविभाग व महाजेनकोच्या मध्यस्तीने वण्यप्राण्याचे तात्काळ नियोजन करण्यात यावे अन्यथा यानंतरही वण्यप्राण्याकडून जीवीत हाणी झाल्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रशासन जिम्मेदार राहील व  तीव्र आंदोलनचा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख   कैलाश तेलतुंबडे , चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष कंत्राटी कामगार सेना व युवासेना विधानसभा समन्वयक चंद्रपूर. जिल्हा महासचिव कंत्राटी कामगार सेना, अमोल मेश्राम  उपतालुका प्रमुख पप्पी यादव युनिट अध्यक्ष प्रफुल सागोरे सचिव प्रमोद कोल्हारकर युनिट उपाध्यक्ष संतोष ढोक  संघटक अमोल भट सहसचिव पंकज इंगोले अक्षय मेश्राम  राजकुमार हजारे यांनी निवेदनातून दिला आहे.