गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या  टोळीचा पर्दापाश..!

145

गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या  टोळीचा पर्दापाश..!

पाच आरोपी अटक, ४८ गोवंश जनावरांची केली सुटका..

टेकडी गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.31 जनवरी 2022

सविस्तर बातमी:- तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कत्तलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दापाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. गडचिरोली जिल्ह्यातून येणारी दोन  मुल तालुक्यातील टेकडी  गावाजवळ
ताब्यात घेण्यात आली. यावेळी पाच तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, ४८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने शनिवारी २९ जानेवारी 2022 ल केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गाने तस्करी..

चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे मोठ्या प्रमाणात नेण्यात येतात. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या बाराचाकी वाहनात जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जाते. जनावरांची तस्करी करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. याबाबतच्या तक्रारी पोलिस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर आळा बसावा, यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी विशेष पथक तयार करून जनावरांची तस्करी  करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती.

गडचिरोली जिल्ह्यातून  10 चक्का ट्रक व 12 चक्का ट्रक येऊन मुल तालुक्यातील टेकडी  गावाजवळ  जनावरे कोंबून तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात वाहतूक केली जात असल्याची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह  मुल तालुक्यातील टेकडी  गावाजवळ सापळा रचला.  त्यानंतर टेकडी  शेतशिवरात दोन्ही ट्रक ताब्यात घेतले.

यावेळी गजानन सायन्ना पेदापुरे (वय २७, रा. कोटेक्लुर ता. देगलुर जि. नांदेड), मोहम्मद अली अजगर अली सय्यद (वय ५६, रा. टेकाडी ता. मुल जि. चंद्रपुर), जाकीर ईब्राहीम खान(वय २९ रा.जंगेमुल ता. पुडुर जि. ईखाराबाद तेंलगना, ), मोहम्मद नदिम मोहम्मद अयुब (वय २३, रा. बनत ता. जि. सांबली), नितेश जंगीदर यादव (वय २७, रा. भवानी बिगह ता. चिकसोला जि. नालंदा) यांच्याविरुद्ध मुल पोलिस ठाण्यात अप क्रमांक 45/22. कलम चा गुन्हा दाखल करण्यात आला. व 5 आरोपींना अटक करण्यात आली .ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात, पिएसाई अतुल कावळे, एएसआई पंडीत वराडे, महांतो, मिलींद चव्हान, दिपक डोंगरे, नितेश महात्मे, दिनेश, प्रमोद कोटनाके,  मयुर येरणे, प्रसाद धुळगंडे यांच्या पथकाने केली.