वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदत, यंग चांदा ब्रिगेड, घुग्घूस

19
वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदत, यंग चांदा ब्रिगेड, घुग्घूस

 

चंद्रपुर/महाराष्ट्र
घुग्घुस/प्रतिनधि

सविस्तर बातमी:- दि. 10 जानेवारी ला, मा. आ. किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालय घुग्घूस तर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत मिनाजुद्दीन शेख रा. वार्ड क्र. 2, बँक ऑफ इंडिया मागे यांना वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदत करण्यात आली. मिनाजुद्दीन शेख यांनी घुग्घूस येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन वैद्यकीय उपचारासाठी मदत मागितली असता त्यांना मदत करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घूस पुरुष आणि महिला सदस्य उपस्थित होते.