यवतमाळ RTO अधिकारीचा प्रभार 160 किमी दुर अधिकारीला सोपविला!

29

 

यवतमाळ आरटीओ कार्यालयात वरिष्ठ अधिकारीचा प्रभार 160 किमी दुर कार्यरत अधिकारीला सोपविला
नागरीकांची गैरसोय, सक्षम अधिकारीला आयुक्तांनी डावलले

 

यवतमाळ/महाराष्ट्र
दि. 08 जनवरी 2022
रिपोर्ट:- शुभम जयस्वाल संवाददाता

सविस्तर बातमी: – यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पदाचा प्रभार येथून 160 किमी दुर वाशिम येथे कार्यरत असलेल्या एका अधिकारीकडे सोपविण्यात आला आहे, परंतु हे अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप नागरीकांकडून होत आहे. ज्या अधिकारीकडे यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा प्रदभार सोपविण्यात आला, परंतु हे अधिकारी हजर राहत नसल्याचे कार्यालयीन कामकाज रखडले, त्यामुळे येथील कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी सुध्दा कंटाळल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

 

160 किमी दुरवर असलेल्या अधिकारीला प्रभार देण्याची काय गरज..?

  • यवतमाळ येथील आरटीओ कार्यालयातच या पदाधिकारीता सक्षम कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी असतांना 160 किमी दुरवर असलेल्या अधिकारीला प्रभार देण्याची काय गरज असा प्रतिप्रश्नही सामान्य नागरीक विचारीत आहेत. शासन निर्णय क्र. एसआरव्ही 2018/प्र.क्र.208/कार्या.12 हे 5 सप्टेबर 2018 ला महाराष्ट्र शासनाने काढले, यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, अतिरिक्त प्रभार देण्यात आलेल्या अधिकारीला अतिरिक्त पगारही मिळेल, असे असतांनाही उपप्रादेशिक परवहिन अधिकारी यवतमाळ पदाचा प्रभार घेतलेले वाशिम येथील अधिकारी महोदय हे यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येत सुध्दा नाहीत.

 

कनिष्ठ अधिकारी, कर्मचारीसुध्दा यामुळे त्रस्त झाले आहेत.
  • परिवहन आयुक्तांनी कसलीही खातरजमा न करता परस्पर यवतमाळ येथील आरटीओ चा प्रभार वाशिम येथील अधिकारीला सोपविला, हे करीत असतांना त्यांनी शासनाच्या मार्गदर्शन सुचनांचे उल्लंघन केले आहे. शासनाने जारी केलेल्या एखाद्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्याबाबत मार्गदर्शक सुचनाचे वाचन करणे परिवहन आयुक्तांनी आवश्यक होते, परंतु ते त्यांनी वाचलेच नसावे, त्यामुळे संबधित परिवहन आयुक्तावर सुध्दा कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. परिवहन आयुक्ताच्या या कारनाम्यामुळे यवतमाळ जिल्हयातील सामान्य नागरीकांची कामे मात्र रेंगाळली आहेत, तसेच या कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी, कर्मचारीसुध्दा यामुळे त्रस्त झाले आहेत.